VAMNICOM Pune Agrowon
ॲग्रो विशेष

VAMNICOM, MCDC Contract : ‘व्हॅम्निकॉम’ आणि ‘एमसीडीसी’मध्ये करार

Vamnicom : वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था आणि महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ लिमिटेड यांच्यामध्ये सोमवारी (ता.१) सहकारी सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रशिक्षण, संशोधन आणि विस्तार उपक्रमांसाठी सामंजस्य करार करण्यात आला.

Team Agrowon

MCDC : पुणे ः वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था आणि महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ लिमिटेड यांच्यामध्ये सोमवारी (ता.१) सहकारी सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रशिक्षण, संशोधन आणि विस्तार उपक्रमांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी मिलिंद आकरे आणि डॉ. हेमा यादव आणि संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.  

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेच्या संचालिका डॉ. हेमा यादव म्हणाल्या, की महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत मागणी आधारित व्यावसायिक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या सुधारणेसाठी व्यावसायिक उपक्रम राबविले जात आहेत. मूल्य साखळी आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन, कृषी निविष्ठा व्यवस्थापन, संशोधन तंत्रज्ञान हस्तांतर, विक्री पायाभूत सुविधा आणि गोदामांची क्षमता निर्माण करण्यासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटींना या उपक्रमाचा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे म्हणाले, की आम्ही कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये शेती आणि बिगरशेती क्षेत्रात काम करणाऱ्या किमान दहा विविध कार्यकारी सेवा सोसायटींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचा सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रशिक्षण, संशोधन आणि विस्तार उपक्रमांसाठी फायदा होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Crisis: दुष्काळ नैसर्गिक संकट, राजकारण नको; कृषिमंत्री भरणे

Banana Growers Conference: पंढरपुरात ४ ऑक्टोबरला राष्ट्रीय केळी परिषद

Cotton Farming Crisis: कपाशीवर संकटाची चाहूल !

Bal Kumar Literature Conference: संगमनेरात २८ सप्टेंबरला बालकुमार साहित्य संमेलन

Sharad Pawar Farmer Relief Demands: दुष्काळप्रश्‍नी पवारांकडून सरकारकडे १७ मागण्या

SCROLL FOR NEXT