Maratha Reservation  Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाची व्याप्ती वाढली

गणेश कोरे

Pune News : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील गावागावांत साखळी उपोषणाची व्याप्ती वाढत आहे. अनेक ठिकाणी मोर्चे, कॅन्डल मार्च, मशाल मोर्चे सुरू आहेत. अनेक ठिकाणी तरूणांनी बेमुदत उपोषणेही सुरू केली आहेत.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासाठी आणि जरांगे यांच्या समर्थनार्थ कॅन्डल मार्च काढून पाठिंबा देण्यात आला.

‘आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे, ‘एक मराठा लाख मराठा,’ ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत कॅन्डल मार्च काढण्यात आला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून काटेआळीमार्गे बाजारतळ आणि तेथून बाजारपेठेतून हा मार्च काढण्यात आला. यामध्ये शेकडो युवक व सकल मराठा समाजाचे नागरिक सहभागी झाले.

शेटफळगढे (ता. इंदापूर) येथे एक दिवसीय अन्न त्याग उपोषण करण्यात आले. त्यानंतर आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत साखळी पद्धतीने उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी ८ वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यात तरुण, महिला भगिनी सर्वांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

जुन्नर तालुक्यातील गावोगावी आंदोलनाचे लोण पोहचले आहे. या आंदोलनास महिला व तरुण वर्गाचा प्रतिसाद वाढत आहे. जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, ओतूर, बनकरफाटा ह्या प्रमुख ठिकाणी समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

विविध गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे फ्लेक्स झळकत आहे. साखळी उपोषणाबरोबर बेमुदत उपोषण देखील करण्यात येत आहे. याचबरोबर कँडल मार्च, भजन, अन्नत्याग आदी माध्यमातून आरक्षणाची मागणी जोर धरत आहे.

जलसमाधी आंदोलन मागे

सराटी (ता. इंदापूर) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नीरा नदीच्या पात्रात मराठा बांधवांनी सुरु केलेले जलसमाधी आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रमणध्वनीद्वारे आंदोलनकर्त्यांची संवाद साधल्यानंतर बुधवारी (ता. १) रात्री ९ वाजता मागे घेण्यात आले.

‘न्यायालयात टिकेल असे कायदेशीर आरक्षण मराठा समाजाला द्यायचे आहे, हा माझा शब्द आहे,’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांना सांगितले. त्यानंतर आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT