Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाची पुणे जिल्ह्यात धग कायम

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या आंदोलनाची धग पुणे जिल्ह्यातही कायम असून, विविध खेडी, गावे, वाडी वस्त्यांवर साखळी उपोषणे सुरू आहेत.
Maratha Reservation
Maratha ReservationAgrowon
Published on
Updated on

Pune News : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या आंदोलनाची धग पुणे जिल्ह्यातही कायम असून, विविध खेडी, गावे, वाडी वस्त्यांवर साखळी उपोषणे सुरू आहेत. या उपोषणांना दिवसेंदिवस प्रतिसाद मिळत असून, महिला आणि लहान मुलांचा देखील सहभाग वाढल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे.

बारामती तालुक्यातील सुपे व काऱ्हाटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण शांततेच्या मार्गाने चालू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सुपे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सोमवारपासून (ता.३० ऑक्टोबर) सुपे परगण्याच्या वतीने परिसरातील तरुण साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत.

Maratha Reservation
Maratha Reservation : आंदोलनाची वऱ्हाडातही धग वाढली

जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा बांधव तसेच ग्रामस्थ विशेष करून विद्यार्थ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सोमवारी (ता.३०) रात्री कँडल मार्च काढून निषेध व्यक्त केला आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथील पंचक्रोशीतील विविध गावांतील सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजातर्फे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. येथील पारोडी फाटा चौकात विविध गावांतील सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे

Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आंदोलनाची धग वाढली, आमदार-खासदारांचे राजीनामा नाट्य

राजुरी (ता.जुन्नर) येथील ग्रामस्थ तसेच मराठा समाजाच्या वतीने सोमवारी रात्री आठ वाजता गावातून कॅंडल मार्च काढण्यात आला होता. दौंड तालुक्यात मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू झाले आहे.

खुटबाव (ता. दौंड) येथे मराठा महासंघाचे अध्यक्ष संजय थोरात, राजेंद्र ढमढेरे, सचिन थोरात, दादा ढोले, सुधीर थोरात, दीपक भापकर, दत्ता शेलार, दिलीप थोरात, बाळासाहेब थोरात, नागनाथ मुळीक, सुभाष देशमुख यांनी उपोषणात सहभाग घेतला.

खामगाव येथे गावातील युवकांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. यावेळी गावामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार व राजकीय नेत्यांना गावबंदीचा फ्लेक्स लावण्यात आला आहे.

निमगाव केतकी (ता.इंदापूर) सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता.३१ ऑक्टोबर) सकल मराठा समाज निमगाव केतकी यांच्या वतीने निमगाव केतकी बंदची हाक देण्यात आली होती. त्याला मंगळवारी ग्रामस्थांनी संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेवून प्रतिसाद दिला, तर बुधवारी (ता.१) एक दिवसाचे साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com