Prahar sanghatna Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Export : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात संत्री फेकून 'प्रहार'चे आंदोलन

Swapnil Shinde

Prahar sanghatna Protest : बांग्लादेशने संत्र्यावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. परिणामी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. संत्र्याला बाजारपेठ न मिळाल्याने हातातोंडाशी आलेला संत्रा ऐन मोसमात रडवित असल्याने या निषेधार्थ अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात संत्री फेक करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही वर्षात विदर्भातून बांगलादेशला संत्रा निर्यातीचा प्रमाण प्रचंड वाढले असून सध्या अडीच लाख टनापेक्षा जास्त संत्रा बांगलादेशला निर्यात होतो. मात्र, गेल्या काही वर्षात बांग्लादेश सरकारने टप्प्याटप्प्याने संत्रा आयातीवर आयात शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतातून बांग्लादेशमध्ये १ किलो संत्री पाठवण्यासाठी ८८ रुपये एवढा खर्च येणार आहे. या निर्णयामुळे अप्रत्यक्षपणे भारतीय संत्र्याला बांगलादेशचे दार बंद झाले आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत संत्र्याचा पुरवठा वाढवून दर कोसळले आहेत. त्याचा फटका विदर्भातील शेतकऱ्यांना बसत आहे.

संत्रा निर्यातीच्या प्रश्नावरुन आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी संत्रा निर्यातीसाठी अनुदान द्यावे, तसेच बाजार हस्तक्षेपर करून सरकारने संत्र्याची खरेदी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी मोठ्या सख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संत्री फेकून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT