Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election 2024 Result : बारामती, शिरूरमध्ये ‘आघाडी’,तर पुणे, मावळात ‘महायुती’ची सत्ती

Result Update 2024 : पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, बारामती, शिरूर आणि मावळ मतदार संघांत अटीतटीच्या लढतील अनुक्रमे मुरलीधर मोहोळ (भाजप), सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार गट) आणि श्रीरंग बारणे (शिवसेना- शिंदे गट) यांनी बाजी विक्रमी आघाडी घेत मारली आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, बारामती, शिरूर आणि मावळ मतदार संघांत अटीतटीच्या लढतील अनुक्रमे मुरलीधर मोहोळ (भाजप), सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार गट) आणि श्रीरंग बारणे (शिवसेना- शिंदे गट) यांनी बाजी विक्रमी आघाडी घेत मारली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी अनुक्रमे रवींद्र धंगेकर (काँग्रेस), सुनेत्रा पवार, शिवाजीराव आढळराव पाटील (राष्ट्रवादी, अजित पवार गट) आणि संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे) गट यांचा पराभवाच्या छायेत लोटले या लढतींमध्ये महाविकास आघाडीला २ आणि महायुतीला २ जागा मिळाल्या आहेत.

पुणे शहर मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यावर १७ व्या फेरी अखेर १ लाख ५ हजार २०६ मतांनी विजयी आघाडी मिळवीली होती. या लढतीत मोहोळ यांना १७ व्या फेरी अखेर ४ लाख ९८ हजार ६४७ मते मिळाली, तर धंगेकर यांना ३ लाख ९३ हजार ४४१ मते मिळाली. ही लढत धंगेकर यांच्या कसबा विधानसभा निवडणुकीच्या कसबा पॅटर्नमुळे चर्चेत आली होती.

धंगेकर यांच्या विधानसभेच्या विजयामुळे आत्मविश्‍वास गमावलेल्या भाजपने तत्कालीन खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेणे टाळले होते. मोहोळ यांच्या विजयाने पुण्यातील जागा भाजपने कायम राखली आहे. मोहोळ यांना महापौर असल्याचा फायदा झाला. तसेच भाजपाचा पुणे शहरातील बेस असल्याचा देखील फायदा झाला. मात्र मागील दोन लोकसभा निवडणुकांमधील मताधिक्य त्यांना गाठता आले नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये अनिल शिरोळे आणि दिवंगत गिरीश बापट यांना तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्य होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मात्र शिवसेना शिंदे गटातून आयात केलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा २४ व्या फेरी अखेर १ लाख ३३ हजार ७६७ मतांची विक्रमी आघाडी घेतली होती. या लढतीत कोल्हे यांना ६ लाख ६३ हजार ६४८ तर आढळराव पाटील यांना ५ लाख २९ हजार ८८१ मते मिळाली. या लढतीमध्ये कांदाप्रश्‍न मोठ्या हिरिरीने मांडल्याचा फायदा कोल्हे यांना झाला. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचाही फायदा कोल्हे यांना झाल्याचे चित्र आहे.

मावळ मतदार संघात शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी हॅटट्रीक साधली आहे. २४ व्या फेरी अखेर बारणे यांनी विक्रमी ९९ हजार ८०० मतांची आघाडी घेतली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांना ५ लाख ८६ हजार २०० मते मिळाली होती. तर बारणे यांना ६ लाख ८६ हजार मते मिळाली होती., गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मोठा मताधिक्क्याने पराभव केल्याने मावळ मतदारसंघ आणि बारणे हे प्रकाशझोतात आले होते. या निवडणुकीत मात्र अजित पवार महायुतीत सामील झाल्याने पवार यांनी बारणेंचा प्रचार केला होता. या लढतीत महाविकास आघाडीने माजी महापौर आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय संजोग वाघेरे यांना शिवसेनेत (ठाकरे गट) घेऊन उमेदवारी दिली होती.

उमेदवारांना मिळालेली मते

पुणे मतदारसंघ (१७ वी फेरीअखेर)

मुरली मोहळ ४ लाख ९८ हजार ६४७

रवींद्र धंगेकर ३ लाख ९३ हजार ४४१

मताधिक्य १ लाख ५,२०६ (मुरली मोहळ)

शिरूर मतदारसंघ (२४ फेरी अखेर)

अमोल कोल्हे ६ लाख ६३ हजार ६४८

आढळराव पाटील ५ लाख २९ हजार ८८१

मताधिक्य १ लाख ३३ हजार ७६७

(अमोल कोल्हे)

मावळ मतदारसंघ (२४ व्या फेरीअखेर)

श्रीरंग बारणे ६ लाख ८६ हजार

संजोग वाघेरे ५ लाख ८६ हजार २००

मताधिक्य ९९ हजार ८०० (श्रीरंग बारणे)

बारामती मतदारसंघ (२४ व्या फेरीअखेर)

सुप्रिया सुळे ७ लाख २८ हजार ०६८

सुनेत्रा पवार ५ लाख ७४ हजार ५३८

मताधिक्य १,५३,०४८ (सुप्रिया सुळे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT