Maharashtra Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain : अनेक दिवसांनंतर काही भागांत पाऊस

Rain Update : खानदेशात सुमारे आठ ते १० दिवसांनंतर तर काही भागात १५ ते २० दिवसांनंतर अनेक भागात मंगळवारी (ता.२२) सायंकाळी मध्यम ते हलका पाऊस झाला.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सुमारे आठ ते १० दिवसांनंतर तर काही भागात १५ ते २० दिवसांनंतर अनेक भागात मंगळवारी (ता.२२) सायंकाळी मध्यम ते हलका पाऊस झाला. सर्वत्र मात्र पाऊस झालेला नाही. यामुळे काही भागासाठी हा पाऊस दिलासादायक ठरला.

जोरदार पाऊस खानदेशात जूनमध्येही अपवादानेच झाला. जुलैत मात्र कुठेही चांगला पाऊस मागील १८ ते २० दिवसांत झालेला नाही. मध्यम ते हलका पाऊस काही भागांत झाला. पावसाची तूट तयार झाली असून, पिकांची स्थिती बिकट बनत आहे. अमळनेर, यावल, रावेर धुळ्यातील शिदखेडा, नंदुरबारातील नंदुरबार, तळोदा, शहादा आदी भागांत कमी पाऊसमान आहे.

नंदुरबारात जूनमधील एकूण सरासरीच्या २० टक्के कमी पाऊस झाला. जळगावात सरासरीएवढा पाऊस जूनमध्ये झाला. १२४ मिलिमीटर एकूण पाऊस जूनमध्ये झाला. पण जुलैत जळगाव जिल्ह्यात पावसाची तूट दिसत आहे.

धुळ्यातही जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पण जुलैत तेथेही कमी पाऊस आहे. जुलै महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू होत आहे. तरीदेखील खानदेशात चांगला पाऊस झालेला नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे आहेत.

खानदेशात मागील आठ ते १० दिवस ऊन तापत आहे. उष्णता वाढली असून, यामुळे पिकस्थिती नाजूक बनत आहे. मंगळवारी मात्र ऊन कमी होते. त्यात सायंकाळी सर्वत्र ढगाळ व थंड वातावरण तयार झाले. खानदेशातील कमाल भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कारण पिकांची वाढ थांबली आहे.

ऊन असल्याने तणनाशकांची फवारणी, किडनाशकांची फवारणी थांबल्याची स्थिती आहे. तसेच केळीसह अन्य भाजीपाला पिके, कापूस पिकात सिंचन करण्याची वेळ आली आहे. कोरडवाहू पिकांची स्थिती सर्वत्र चांगली नसल्याने शेतकरी चितेत आहेत. यामुळे जोरदार पावसाची गरज असल्याचा मद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

रावेरात काही भागांत दिलासा

रावेरात मंगळवारी दक्षिण क्षेत्रात पाऊस झाला. सायंकाळी सुमारे २० मिनिटे ते अर्धा तास पाऊस काही भागात झाला. त्यात वाघोदा, मस्कावद, विवरे, नांदुरखेडा, निंबोल आदी भागांत मध्यम पाऊस झाला. पातोंडी भागात कमी किंवा हलका पाऊस झाला.

विटवा भागातही मध्यम ते हलका पाऊस होता. रावेर शहरातही हलका पाऊस झाला. नजीक यावलमधील पिपरूड भागातही तुरळक पाऊस झाला. सर्वत्र मात्र पाऊस नव्हता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT