Latur,Dharashiv Rain: लातूर, धाराशिवला पावसाची जोरदार हजेरी

Monsoon 2025: मोठ्या खंडानंतर लातूर, धाराशिव या दोन्ही जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
Latur,Dharashiv Rain
Latur,Dharashiv RainAgrowon
Published on
Updated on

Latur News: मोठ्या खंडानंतर लातूर, धाराशिव या दोन्ही जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे पावसाची डोळ्यात तेल घालून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पावसाने सुकत असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

लातूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४  तासांत सरासरी ३०.५  मिलिमीटर तर धाराशिव जिल्ह्यात सरासरी २८. ४ मिलिमीटर पाऊस झाला आहे? लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक ६२.३ मिलिमीटर, तर जळकोट तालुक्यात सर्वात कमी १२.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Latur,Dharashiv Rain
Latur district Rain : मॉन्सूनपूर्व पावसाचा लातूर जिल्ह्यात कहर

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- ३२.६, औसा- ३५.६, अहमदपूर- १२.६, निलंगा- ३१.९, उदगीर- ३०.९, चाकूर- ३०.३, रेणापूर- ३४.४, देवणी- २५.६, शिरूर अनंतपाळ- ६२.३ आणि जळकोट- १२.५ मिलिमीटर. पेरण्यानंतर पावसाने हुलकावणी दिली होती. काही भागात कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत होता.

Latur,Dharashiv Rain
Latur Unseasonal Rain : लातूर जिल्ह्यात बेमोसमी पावसाने थैमान

मात्र, तो पिकांसाठी पुरेसा नव्हता. यामुळे शेतकरी तुषार सिंचनाच्या साह्याने पिकांना जगवण्याचा प्रयत्न करत होते. पेरण्यानंतर महिन्यापासून मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. सोमवारी सायंकाळी ती पूर्ण झाली. मंगळवारी (ता. २२) पावसाचे वातावरण असून आणखी पाऊस होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. 

धाराशिव जिल्ह्यातही पावसाची हजेरी 

धाराशिव जिल्ह्यातही पावसाने मोठा खंड दिला होता पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत होते. सोमवारच्या पावसामुळे पिकांना मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यात सोमवारी तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे आहे. धाराशिव ः ३२, , तुळजापूर ः २७.६, परंडा ः १२, भूम ः ३१.२, कळंब ः  ३१.७, उमरगा ः ३०.२, लोहारा ः २३.७ व वाशी ः ४१.४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com