Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : पहिल्याच पावसानंतर ऊस लागवडीची लगबग

Team Agrowon

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात सुरुवातीपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली असून यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्‍वभूमीवर काही भागांत शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसानंतर धाडस दाखवत ऊसलागवड हाती घेतली आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे ऊस मोडलेले शेतकरी पावसानंतर लागवडीसाठी पुढे येत असून काही भागांत खरिपाच्या पेरण्या तर काही भागात ऊस लागवडीची लगबग दिसून येत आहे.

सध्या येडशी, कसबे तडवळे व ढोकी परिसरात हे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत जोरदार पाऊस झाला नाही. बागायती क्षेत्रातही उसाचे पीक कमी झाले. बागायतदार शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे ऊस असल्याने चांगला पाऊस न झाल्याने त्यात वाढ झाली नाही. गेल्या वर्षी तर तुलनेने कमी पाऊस झाला.

त्यामुळे आहे तो ऊस मोडावा लागला. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्व भागांत सारखा पाऊस झाला. यामुळे शेतकरी सुखावले. भूजलाची पातळी वाढून विहिरींनाही पाणी आले. यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी पुढाकार घेतला. हवामान विभागानेही यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचा धोका पत्करला आहे.

कसबे तडवळे, येडशी व ढोकी परिसरात वीस किलोमीटरच्या अंतरात तीन साखर कारखाने तसेच चार गूळपावडर निर्मिती कारखाने आहेत. गेल्या वर्षी या कारखान्यांमध्ये उसाला दर देण्यासाठी स्पर्धा लागली होती. गेल्या वर्षी उसाला चांगला भाव मिळाला. यामुळेच शेतकऱ्यांनी जास्त विचार न करता ऊस लागवडीला सुरुवात केल्याचे चित्र आहे.

काही वर्षांत पाऊस कमी होऊन भूजलाची पातळी घटल्याने ऊसाला पाणी कमी पडत होते. यामुळे मी वीस एकर ऊस मोडला. यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला पाऊस पडत आहे. पुढील काळातही पाऊस चांगला पडणार आहे, असा हवामान विभागाचा अंदाज असल्याने मी आता पाच एकर नवीन उसाची लागवड केली आहे.
राजाभाऊ लोंढे, ऊस उत्पादक शेतकरी, कसबे तडवळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

Onion Processing : महिला शेतकऱ्यांनी कांदा प्रक्रियेतून संधी निर्माण कराव्यात

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यातील निवडणुंकांसाठी आयोग सज्ज, मात्र तारखा गुलदस्त्यात

Buffalo Subsidy : ‘वारणा’ देणार म्हैस खरेदीसाठी ४२ हजार रुपयांचे अनुदान

SCROLL FOR NEXT