Agriculture Sowing : बीड जिल्ह्यात जवळपास निम्मी पेरणी उरकली

Kharif Sowing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा खरिपाच्या प्रस्तावित सात लाख ८५ हजार ७८६ हेक्टर क्षेत्रापैकी तीन लाख ५६ हजार ८८६ हेक्‍टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४५.४२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी आटोपली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा खरिपाच्या प्रस्तावित सात लाख ८५ हजार ७८६ हेक्टर क्षेत्रापैकी तीन लाख ५६ हजार ८८६ हेक्‍टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४५.४२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी आटोपली आहे. या पेरणीमध्ये परळी तालुक्याने आघाडी घेतली असून त्या पाठोपाठ गेवराई, शिरूर आदी तालुक्यांमध्ये पेरणीचा टक्का अनुक्रमे आघाडीवर आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी बीड तालुक्यात १ लाख १९ हजार ९७५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. आतापर्यंत या प्रस्तावित क्षेत्रापैकी ६० हजार ०४७५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पाटोदा तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या ५६ हजार ८६५ हेक्टर क्षेत्रापैकी १७,१२३ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. आष्टी तालुक्यात प्रस्तावित ९३ हजार ८ हेक्टर क्षेत्रापैकी २४ हजार १९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. शिरूर तालुक्यात प्रस्तावित ५०७२९ हेक्टर क्षेत्रापैकी २९ हजार २२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Agriculture Sowing : गेवराईत ६० टक्के पेरा; यंदा कपाशीला प्राधान्य

माजलगाव तालुक्यात प्रस्तावित ६८,७१३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २८ हजार ६२३ हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे. गेवराई तालुक्यात प्रस्तावित १ लाख ६ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६८ हजार ३७६ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. धारूर तालुक्यात प्रस्तावित ४१ हजार १८२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १० हजार १८६ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सर्वात कमी २५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. वडवणी तालुक्यात प्रस्तावित २९ हजार ९९५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १५ हजार २८३ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यात प्रस्तावित ६९,५२० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २७ हजार ४७३ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Agriculture Sowing : नाशिक जिल्ह्यात अवघ्या ६ टक्के खरीप पेरण्या

केज तालुक्यात प्रस्तावित ९२ हजार १८२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३३ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३६ टक्के इतकी आहे. परळी तालुक्यात प्रस्तावित ५७ हजार २५० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४२ हजार ७०४ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक ७५ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी आटोपली आहे.

कपाशीची निम्मी लागवड, सोयाबीनची त्याही पुढे पेरणी

यंदा जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५५ हजार ४९४ हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. त्या क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ७७ हजार ९५२ हेक्टर म्हणजे ५० टक्के क्षेत्रावर कपाशी लागवड आटोपली आहे. दुसरीकडे सोयाबीनची प्रस्तावित २ लाख २६ हजार २३४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत एक लाख ३३ हजार २२ हेक्टर म्हणजे ५९ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com