Hurricane Agrowon
ॲग्रो विशेष

Hurricane : आग्नेय आशियानंतर भारतावर ‘यागी’चे ढग

Weather Update : तब्बल ३८०० किलोमीटर अंतरावर प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम भारताच्या हवामानावर होत आहे.

Team Agrowon

New Delhi : तब्बल ३८०० किलोमीटर अंतरावर प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम भारताच्या हवामानावर होत आहे. अर्थात, यागीचा परिणाम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशसाठी फायदेशीर ठरला आहे. या भागातील पावसाची उणीव या वादळामुळे भरून निघाली आहे. यागी चक्रीवादळ पश्‍चिमेकडे म्हणजेच भारताकडे वळत आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्राने यागी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या व्हिएतनामला सुमारे दोन दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली आहे. व्हिएतनामध्ये सुमारे २९० जण मृत्युमुखी पडले. याशिवाय अडीच लाख घरांची हानी झाली असून, तीस लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे.

प्रशांत महासागरात निर्माण झालेले वादळ सुरुवातीला चीनच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकले आणि त्याचा बदल विनाशकारी चक्रीवादळात झाला. त्याचा वेग ३५० किलोमीटर प्रतितास होता. या चक्रीवादळाने फिलिपिन्स, व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार, लाओसला धडक दिली. काही दिवसांपूर्वी यागी वादळाचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून, आता ३८०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून भारतात प्रवेश करत आहे.

या चक्रीवादळाचा परिणाम दिल्ली-एनसीआर, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस पडत आहे. मात्र यागी चक्रीवादळाचा परिणाम लवकरच संपेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पण परतीचा पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरत आहे. यागी चक्रीवादळामुळे भारतातील हवामान बदलण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पश्‍चिम आणि पूर्व राजस्थानात पाऊस पडू शकतो. २७ सप्टेंबरनंतर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT