Indian Spices Product Ban Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Spices Product Ban : आधी हाँगकाँग-सिंगापूर आणि आता शेजारच्या देशाने घातली भारतीय मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

Ban on sale of Indian spices : भारताच्या शेजारी देशाच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने १०० वर्षांहून अधिक जुन्या भारतीय मसाला कंपन्यांच्या एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : भारतीय मसाल्यांसमोर दिवसेंदिवस बंदीचे संकट वाढत असून गेल्या महिन्यात यावर बंदी घालण्यात आली होती. सिंगापूर आणि हाँगकाँगने मसाल्यांवर बंदी घातल्यानंतर आता भारताच्या शेजारील देश नेपाळणे देखील भारतीय मसाल्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच काही मसाल्यांच्या विक्री आणि आयातीवर बंदी घातली आहे.

नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने १०० वर्षांहून अधिक जुन्या भारतीय मसाला असणाऱ्या एव्हरेस्ट आणि एमडीएच कंपनीच्या मसाल्यांच्या आयात, वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. याशिवाय इथिलीन ऑक्साईडच्या प्रमाणाचाही तपास सुरू करण्यात आला आहे. इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याने एमडीएच आणि एव्हरेस्टच्या चार उत्पादनांवर याआधीच बंदी घालण्यात आली आहे.

कोणत्या मसाल्यांवर बंदी

एमडीएच आणि एव्हरेस्टच्या ज्या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यात मद्रास करी पावडर, सांबार मिक्स मसाला पावडर, एमडीएचची मिक्स्ड मसाला करी पावडर आणि एव्हरेस्ट फिश करी मसाला पावडर यांचा समावेश आहे.

यावरून नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'ही निकृष्ट उत्पादने बाजारात विकली जात असून जी हानिकारक आहेत. याबाबत एका मीडिया रिपोर्ट्सने आमचे लक्ष वेधले असून यानंतरच केलेल्या तपासात या चार उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. त्यामुळे या उत्पादनांच्या आयात आणि विक्रीवर देशात बंदी घालण्यात आली आहे. तसेच आयातदार आणि व्यापाऱ्यांना ही उत्पादने बाजारातून मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हाँगकाँग आणि सिंगापूरनेही घातली बंदी

दरम्यान याआधीच गेल्या महिन्यात हाँगकाँग आणि सिंगापूरने काही मसाल्यांवर बंदी घातली होती. भारतीय मसाला भागधारक फेडरेशन (FISS) ने शुक्रवारी सांगितले की, निर्यातीसाठी मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण सापडले आहे. यावर लवकर तोडगा न काढल्यास आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताच्या मसाल्याच्या निर्यातीत सुमारे ४० टक्क्यांची घट होऊ शकते.

भारतीय मसाले मंडळाच्या मते, भारत हा जगातील अग्रगण्य मसाले उत्पादक देशांपैकी एक असून २०२२ मध्ये सुमारे १८० देशांना २०० हून अधिक मसाले भारताने पाठवले आहेत. जे ४ अब्ज डॉलर मूल्यवर्धित आहे.

कोणती पावले उचलली?

या बंदीनंतर भारतीय मसाले बोर्डाने भारतीय मसाल्यांच्या निर्यात, सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली आहेत. बोर्डाने तांत्रिक-वैज्ञानिक समितीच्या शिफारशी लागू केल्या आहेत. तसेच मुख्य कारण शोधण्यासह प्रक्रिया सुविधेचीही पाहणी केली जात आहे. तर मसाल्यातील नमुने चाचणीसाठी प्रमाणित प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

मंडळाने १३० हून अधिक निर्यातदार आणि संघटनांचा समावेश असलेल्या भागधारकांशी सल्लामसलत केली आहे. तसेच सर्व निर्यातदारांना ईटीओ उपचारासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. भारतातून निर्यात होणाऱ्या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण वाढू नये म्हणून देखील भारतीय मसाले बोर्डाने पाऊल उचलली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तिळाच्या दरात सुधारणा; सोयाबीन टिकून, कांदा दरात चढ उतार, पेरु दरात सुधारणा तर फ्लाॅवर आवक सुधारली

Cow Smuggling: गडचिरोली जिल्ह्याला गोवंश तस्करीचे ग्रहण

Rabi Crop Insurance: रब्बीच्या पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग कमी

Panjre Project: पांझरे प्रकल्पाच्या पाण्यातून देवभाने धरण भरण्यासाठी नियोजन

Rose Cultivation: गुलाब लागवडीमध्ये अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT