Dhuḷe News: देवभाने (ता. धुळे) येथील धरण देवभाने, सरवड व धनूर- लोणकुटे शेती शिवारासाठी महत्वाचे आहे. हे धरण या गावांची तहानही भागवित असते. मात्र, लहानशा नदीवर मोठे धरण असल्याने ते लवकर भरत नाही. पावसाळा कमी असला तर साठ- सत्तर टक्केच भरत असते. या धरणात पांझरेसह अक्कलपाड्याचे पाणी राखीव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.. पांझरेच्या प्रवाही पाण्यातून धरण भरण्यासाठी तांत्रिक बाबींचा अभ्यास केला जात आहे. ही उपाययोजना करण्यासाठी आमदार राम भदाणे प्रयत्नशील असल्याचे जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे यांनी सांगितले..POCRA Project: पोकरा अंतर्गत वैयक्तिक लाभासाठी सहा हजारांवर अर्ज.देवभाने धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन मनोहर भदाणे यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. या वेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष भटू पाटील, मराठा सेवा संघाच्या कृषी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, तुषार माळी, दुर्गेश पाटील, शेतकरी प्रभाकर देसले, भिकन देसले, नथ्थू भामरे, राहुल सोनवणे, स्वामी देसले, दिनेश देसले, मिलिंद देसले, सागर देसले, दत्तू देसले, विक्की देसले, उदय देसले, निलेश देसले आदी उपस्थित होते..Vidarbha Irrigation Project: हुमन प्रकल्प रखडल्याने ४६ हजार हेक्टर क्षेत्र कोरडे.श्री. भदाणे म्हणाले, देवभाने हे धुळे ग्रामीणमधील महत्वाचे धरण आहे. बऱ्यापैकी पावसाळा असूनही भरण्यास उशिर होतो. ते लहानशा नदीवर आहे. परिणामी, पावसाळ्यात लवकर भरत नाही..अक्कलपाड्याचे पाणी देवभानेसाठी राखीव हवेमाजी अध्यक्ष भदाणे म्हणाले, अक्कलपाड्याची निर्मिती झाली त्यावेळी देवभाने धरणासाठीही पाणी राखीव करणे आवश्यक होते. तत्कालीन संबंधितांनी दुर्लक्ष केले. हितवर्धक आरक्षण करून घेतले. आता हे धरण भरण्यासाठी पांझरेचे वाहून जाणारे पाणी कमी खर्चात टाकण्यासाठी नियोजन सुरू आहे. निमडाळेपर्यंत येणारे पाणी ग्रॅव्हेटीने या धरणात टाकण्यासाठी अभ्यास केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.