Water Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजना रद्द केल्याने अकोल्यातील नागरिक काढणार उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

अकोला जिल्ह्यात बाळापूर व अकोला तालुक्यातील खारपाणपट्ट्यात असलेल्या गावांसाठी मंजूर झालेली ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना स्थगित केल्याने आता याविरोधात उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर नागपूरला मोर्चा काढला जाणार आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यात बाळापूर व अकोला तालुक्यातील खारपाणपट्ट्यात असलेल्या गावांसाठी मंजूर झालेली ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (Water Supply Scheme) स्थगित केल्याने आता याविरोधात उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर नागपूरला मोर्चा (Protest) काढला जाणार आहे.

खारपाणपट्ट्यातील पाण्याचे टँकर (Water Tanker) अकोला ते नागपूर पायी दिंडी काढून नेले जाईल, अशी माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिली.

बाळापूर, अकोल्यातील गावांसाठी पाणीपुरवठा योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली होती. मंजुरीनंतर कामही सुरू झाले.

योजनेसाठी वान प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यात आले. ४३ किलोमीटर अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे नियोजन होते.

त्यापैकी २७ किलोमीटरपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली. २१९ कोटींच्या या योजनेवर आतापर्यंत १२५ कोटींचा खर्च झाला. आता या योजनेला स्थगिती देण्यात आली, अशी टीका आमदार देशमुख यांनी केली.

या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, विकास पागृत, पूर्वचे प्रमुख राहुल कराळे, पश्‍चिमचे प्रमुख राजेश मिश्रा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ही पायी दिंडी सोमवारी (ता. १०) अकोल्यातील राजेश्‍वर मंदिरापासून सुरू होणार आहे.

राजेश्वराला जलाभिषेक करून दिंडी मार्गस्थ होईल. नागपूरपर्यंत नऊ ठिकाणी मुक्काम केला जाईल. शुक्रवारी (ता. २१) ही यात्रा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी दिंडी पोहोचणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Acquisition: विमानतळासाठी सात गावांमध्ये भूसंपादन क्षेत्र ४० टक्क्यांनी कपात

Pune Heavy Rain: मुसळधार पावसामुळे भातरोपे तरारली

Maharashtra Farmer Protest: शेतमजूर, शेतकरीप्रश्‍नी मुंबईत २८ ऑक्टोबरला धडक : कडू

Gorakshak Attacks: हल्ले बंद न झाल्यास पोलिस स्थानकांत छावण्या उभारू: आमदार सदाभाऊ खोत

Ganpati Festival 2025: सिंधुदुर्गात गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची लगबग

SCROLL FOR NEXT