Mumbai News: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सोमवारी (ता. २३) राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यामध्ये शेती क्षेत्रामध्ये राज्य सरकारने केलेल्या उल्लेखनीय कामांचा आढावा घेत सरकार शेतकऱ्यांप्रती कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. .विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ झाला. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते योजना, भारतीय कापूस महामंडळाद्वारे कापूस खरेदी, किमान आधारभूत किंमत, खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला शेतीमाल,.ई-राष्ट्रीय कृषी बाजारअंतर्गत आंतर बाजार व आंतरराज्य व्यापार सुरू करण्यासाठी एकीकृत लायसनची तरतूद, शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेती किंवा पीककर्जाशी संबंधित कर्जाच्या दस्तऐवजांवर मुद्रांक शुल्क सूट, नैसर्गिक आपत्ती ....१५ हजार ५७६ कोटी रुपयांचे वितरण, शेतीला दिवसा वीजपुरवठा आणि अन्य कृषी विषयक योजनांचा आढावा घेत राज्य सरकार शेतकऱ्यांना सुविधा पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले..Ai in Agriculture: शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ‘एआय’ तंत्रज्ञान पोहोचविणार.ते पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण लागू करून शेती अधिक उत्पादक करण्यावर भर देण्यात आला आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत ३ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर ७ हजार शेतकरी गट कार्यरत आहेत. कापूस व सोयाबीन खरेदी, पीकविमा व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना १५ हजार ५७६ कोटींची थेट मदत देण्यात आली. ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’अंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज देण्यात येत असून ४४ लाख शेतकऱ्यांना २५,०८७ कोटींचा दिलासा देण्यात आला आहे..सौरपंप बसविण्यात राज्याने विक्रम प्रस्थापित केला असून त्याची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली. तसेच राज्याच्या जलसंधारण आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम राज्याचे प्रथम पारितोषिक महाराष्ट्राला प्राप्त झाले आहे..Agriculture Development: ‘आयएएस’ करतील शेतीचा कायापालट.२०२४-२५ या पणन हंगामामध्ये ‘किमान आधारभूत किंमत खरेदी योजने’ अंतर्गत नोंदणी केलेल्या ७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना २ हेक्टर मर्यादेपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम म्हणून प्रती हेक्टर २०,००० रुपये वितरित केले, असेही ते म्हणाले..सीमावाद सोडविण्यासाठी ठोस पावलेसीमावादाबाबत राज्यपाल देवव्रत म्हणाले, की राज्याच्या सर्वांगीण, समावेशक आणि शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध असून विकसित महाराष्ट्राच्या दिशेने राज्याची दमदार वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध असून सर्वोच्च न्यायालयात राज्याची भक्कम बाजू मांडण्यासाठी नामांकित वकिलांची नियुक्ती केली आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी शिक्षण, आरोग्य व विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले..गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवरमहाराष्ट्राचा देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात १३.५ टक्क्यांहून अधिक वाटा असून २०२४-२५ या वर्षात राज्याला १,६४,८७५ कोटींची थेट परकीय गुंतवणूक प्राप्त झाली. ही देशातील एकूण गुंतवणुकीच्या ३९ टक्के आहे. २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीत ९१,३३७ कोटींची गुंतवणूक राज्यात आली असल्याचे राज्यपालांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.