Pune News : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २४) पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली निवळून जाण्याची शक्यता आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे..सोमवारी (ता. २३) पंजाबच्या भटिंडा आणि अदमपूर येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी ९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये आंध्र प्रदेशच्या कर्नूल येथे देशातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..Rain Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा तडाखा.राज्यात उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या असतानाच, अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २४) पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..सोमवारी (ता. २३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३४.४---१७.१अहिल्यानगर---निरंक---१६.३धुळे---३४.५---१३.६जळगाव---३५.४---१६जेऊर---३५.५---१६कोल्हापूर---३४.९--२२.२महाबळेश्वर---२६.७---१८.मालेगाव---३४.४---१५.६नाशिक---३४.३---१६.३निफाड---३२.४---१२.४सांगली---३५.८---२२.१सातारा---३३.९---१८.२सोलापूर---३५.८---२२.४सांताक्रूझ---३४.५---२१डहाणू---३४---१९.६रत्नागिरी---३३.६---२३.Maharashtra Rain Forecast: पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता.छत्रपती संभाजीनगर---३४.६---१८.६धाराशिव---३३.७---१६परभणी---३४.४---२०परभणी (कृषी)---३३.९---१७.६अकोला---३६.१---१९.६अमरावती---३५.६---१७.९भंडारा---३३.८---२०.६बुलडाणा---३३.८---२०.६.ब्रह्मपुरी---३६.४---२०चंद्रपूर---३५.२---२३.६गडचिरोली---३३.६---१७.२गोंदिया---३३.८---१८.४नागपूर---३४---१८.४वर्धा---३५---२२वाशीम---३४.८---१७.४यवतमाळ---३४---निरंक.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१२.४---३५.४पश्चिम महाराष्ट्र---१६---३५.८मराठवाडा---१७.६---३४.६विदर्भ---१७.२---३६.४कोकण---१९.६---३४वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :चंद्रपूर, गडचिरोली.विजांसह पावसाची शक्यता :सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.