Kolhapur News: इथेनॅाल पुरवठा वर्ष २०२४-२५ मध्ये मक्याने इथेनॅाल निर्मितीत निर्विवाद आघाडी घेतली आहे. साखर उद्योगाला मक्याने मागे टाकले आहे. ऑल इंडिया डिस्टिलर असोसिएशनने (एआयडीए) ही माहिती दिली. .या वर्षात धान्य-आधारित कच्च्या मालाचा वाटा ७१८ कोटी लिटर होता, जो एकूण इथेनॉल निर्मितीच्या जवळपास ६९ टक्के इतका होता. ऊस-आधारित कच्च्या मालाचा वाटा ३२१ कोटी लिटर म्हणजे ३१ टक्के होता. धान्याआधारित इथेनॅाल मध्ये तब्बल ५१ टक्के इथेनॅाल हे केवळ मक्यापासून तयार झाले..India Ethanol Import: अमेरिकेतून इथेनॉल आयातीची संदिग्धता कायम.संघटनेच्या माहितीनुसार, यंदा आतापर्यंत १०३९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला असून, करारबद्ध १,१६३ कोटी लिटरच्या तुलनेत ८९ टक्के पूर्तता साध्य झाली आहे. यामध्ये धान्यआधारित स्रोतांकडून ७१८ कोटी लिटर, तर ऊसआधारित स्रोतांकडून ३२१ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे..सरकारी धोरणे, तसेच मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी ७१.८६ रुपये प्रति लिटर दरामुळे मक्यावर आधारित उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. देशातील इथेनॉल उद्योगाची एकूण उत्पादन क्षमता आता सुमारे २००० कोटी लिटरपर्यंत पोहोचली असून, ३८० हून अधिक डिस्टिलरी कार्यरत आहेत. आणखी ३३ प्रकल्प उभारणीच्या टप्प्यात आहेत. भारताने २०२५ मध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट आधीच गाठल्याचे संघटनेने म्हटले आहे..Ethanol Blending: इथेनॉलमुळे १९ अब्ज डॉलर्स परकीय चलनाची बचत.इथेनॉल उत्पादन क्षमता झपाट्याने वाढत असल्याने ई-२० (इथेनॉल मिश्रित प्रोग्रॅम-इबीपी) नंतरचे धोरण आखण्याची गरज असल्याचे संघटनेने सरकारकडे नमूद केले आहे. इथेनॉल-डिझेल मिश्रण, आयसोब्युटेनॉल आणि फ्लेक्स-फ्युएल वाहनांना प्रोत्साहन देण्याची मागणी नव्याने करण्यात आली आहे. यामुळे वाढीव उत्पादन क्षमता वापरात येईल आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च आणखी कमी होईल..साखर उद्योगाची कोंडीगेल्या काही वर्षांत साखरेचा साठा वाढल्याने आणि दरावर दबाव आल्याने, इथेनॉल उत्पादन हे साखर कारखाना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अप्रत्यक्ष उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरले होते. साखर कारखान्यांना इथेनॉलमधून मिळणाऱ्या महसुलामुळे ऊस दर देणे शक्य झाले होते. साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलला दर कमी मिळत असल्याने साखर उद्योगातून मात्र नाराजी आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.