Natural Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming : रसायनमुक्त शेतीमाल उत्पादनासाठी नैसर्गिक शेती पद्धतीचा स्वीकार गरजेचा

Organic Farming : सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी शाश्‍वत उत्पन्नासाठी फळपिकांची लागवड करावी.

Team Agrowon

Parbhami News : सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी शाश्‍वत उत्पन्नासाठी फळपिकांची लागवड करावी. रासायनिक अवशेषमुक्त शेतीमालाच्या उत्पादनांसाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती पद्धतीचा स्वीकार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी केले.

दिवेकर यांनी गुरुवारी (ता. २८) पेडगाव येथील प्रगतिशील शेतकरी विजय जंगले यांच्या शेतीस भेट देऊन फळबागेची पाहणी केली.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक अभिषेक घोडके, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे (परभणी), तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख (पालम), तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रमेश इक्कर, प्रमोद रेंगे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वाती घोडके, सीमा जंगले, मंडळ कृषी अधिकारी खिल्लारे, कृषी सहायक हनवते आदी उपस्थित होते.

या वेळी दिवेकर यांनी जंगले यांची संत्रा, लिंबू फळबाग लागवड, गांडूळ खत निर्मिती युनिट, ठिबक, तुषार, शेततळे आदी घटकांची पाहणी केली. दिवेकर म्हणाले, की रासायनिक निविष्ठांचे आरोग्यवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासह उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज आहे. नैसर्गिक शेतीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत घटकाचा लाभ घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून

Flood Relief Fund: राज्य सहकारी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी दहा कोटी

Sindhudurg Heavy Rain: समुद्रात वादळी स्थिती, देवगडबंदरात शेकडो नौका आश्रयाला

Flood Relief: मदतीबाबत ‘काथ्याकूट’

Farmer Death: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ

SCROLL FOR NEXT