Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Pest Disease Control : कीड-रोग नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा अवलंब करा

Integrated Pest Control : ऑगस्ट-सप्टेंबरमधील हवामान पिकावर येणाऱ्या रोगांसाठी अत्यंत पोषक असते. त्यामुळे नियमितपणे पीक पाहणी करून पिकांवर असलेल्या लक्षणांवरून वेळीच एकात्मिक पद्धतींचा अवलंब करावा.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : येथील कृषी विज्ञान केंद्रात नुकताच १०१ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम झाला. या वेळी कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी शासनाने एकात्मिक पद्धतीने नियंत्रणाचा अवलंब करण्याचा सल्ला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांनी दिला.

कार्यक्रमात राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर येथील पीक रोगशास्त्रज्ञ डॉ. डी. जी. हिंगोले आणि कृषी कीटकशास्त्रज्ञ डॉ. एन. आर. पतंगे यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

फुलंब्रीचे तालुका कृषी अधिकारी भरत कासार, छत्रपती संभाजीनगरच्या कृषी विभागाचे श्री. सिसोदिया, केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. संजूला भावर, जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, शेतकरी यांची उपस्थिती होती.

डॉ. हिंगोले म्हणाले, की ऑगस्ट-सप्टेंबरमधील हवामान पिकावर येणाऱ्या रोगांसाठी अत्यंत पोषक असते. त्यामुळे नियमितपणे पीक पाहणी करून पिकांवर असलेल्या लक्षणांवरून वेळीच एकात्मिक पद्धतींचा अवलंब करावा. कपाशीच्या पिकामध्ये खालच्या पानावर पानाच्या खालच्या बाजूला पांढरट बुरशींची वाढ दिसते व नंतर सर्व झाडावर पसरते. याच्या नियंत्रणासाठी जैविक व रासायनिक बुरशीनाशकांची तज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा. सोयाबीनमध्ये चारकोल रॉट येण्याची शक्यता असते.

ज्यामध्ये पाने पिवळी पडून झाड मरते अशावेळी टेब्यूक्यूनाझोल अधिक सल्फर या संयुक्त बुरशीनाशकाच्या दोन फवारण्या घ्याव्यात. तूर पिकातील मर, अद्रक पिकातील कंदकुज-कंदमाशी यांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा, बॅसिलस, सुडोमोनास, मेटारायझियम या जैविक बुरशीचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी रोग येण्याआधीच आपल्या शेतीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. डॉ.पतंगे म्हणाले, की सध्या कापूस पिकातील रस शोषण करणाऱ्या किडीचे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे.

यासाठी निळे व पिवळे चिकट सापळ्यांचा वापर तसेच निंबोळी अर्काच्या १५ दिवसांच्या अंतराने शेतकरी बांधवांनी फवारण्या घेणे गरजेचे आहे. तसेच गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी एकरी दोन कामगंध सापळे लावावेत व तज्ञांच्या सल्यानुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.

विविध पिकातील हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम या जैविक बुरशीनाशकाचा वापर करावा. तसेच विविध पिकांतील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी पक्षी थांबे, प्रकाश सापळे, फळमाशी सापळे, कामगंध सापळे इत्यादी एकात्मिक पद्धतींचा वापर आपल्या शेतीमध्ये करावा. या कार्यक्रमामध्ये शेवटी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे शास्त्रज्ञाद्वारे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजूला भावर, तर आभार व सूत्रसंचालन डॉ. बस्वराज पिसुरे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Logistics Hub: सोलापूर देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ बनणार

Urea Black Market: अनुदानित ५८ टन युरियाची काळ्या बाजारात विक्री

Gokul Milk Price Hike: अमूल पाठोपाठ गोकुळ दूध दरात २ रुपयांची वाढ

Shaktipeeth Highway Project: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनात ‘एनए’चे रॅकेट ?

Car Cargo Project Issue: ‘कार कार्गो’ प्रकल्प कागदावरच

SCROLL FOR NEXT