Fertilizer Scam: नांदेड जिल्ह्यात अनुदानित रासायनिक खताचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शिवकृपा कृषी विकास केंद्र चालकाविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायदा आणि खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई-पॉस यंत्रणेमध्ये तब्बल ५८.४७ टन युरिया आणि २.२५ टन डीएपी खताचा साठा दाखविण्यात आला होता; मात्र प्रत्यक्ष दुकान व गोदामात खताची एकही बॅग आढळून आली नाही..जिल्ह्यातील युरिया व इतर खतांच्या साठ्याची तपासणी करण्याचे आदेश मिळाल्यानंतर शनिवारी (ता. ९) कृषी विभागाच्या पथकाने मुदखेड तालुक्यातील विविध कृषी केंद्रांची तपासणी केली. या पथकात मुदखेडचे कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) प्रमोद हिलालपुरे, लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) बालाजी मुंडे, जिल्हा परिषद मोहीम अधिकारी सचिन कपाळे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम तसेच कृषी अधिकारी व्ही. एस. निरडे यांचा समावेश होता..Urea Black Market : युरियाचा साठा करून जादा दराने विक्री.पथकाने माळकौठा येथील मे. शिवकृपा कृषी विकास केंद्र येथे अचानक भेट देऊन दुकान व गोदामाची तपासणी केली. यावेळी ई-पॉस नोंदीनुसार आयपीएल कंपनीचा १.६५ टन, एनएफएल कंपनीचा २.५६ टन, इफको कंपनीचा १८ टन तसेच सीएफसीएल कंपनीचा १७.२८ टन असा एकूण ५८.४७ टन युरिया साठा दाखविण्यात आला होता. याशिवाय आयपीएल कंपनीचा २.२५ टन डीएपी खतसाठाही नोंदीत होता..Urea Black Marketing: शेतकऱ्यांसाठीचा युरिया औद्योगिक वापरासाठी वळवला, काळाबाजार रोखण्यासाठी कोकण विभागात कारवाईचा बडगा.मात्र प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दुकान व गोदामात युरिया किंवा डीएपी खताची एकही बॅग आढळली नाही. याबाबत दुकानदार माधव हाळे यांच्याकडे खत विक्रीची बिले मागविण्यात आली असता, ते कोणतेही वैध दस्तऐवज सादर करू शकले नाहीत. तसेच स्टॉक बुक आणि भावफलकावरही आवश्यक नोंदी नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले..अनुदानित खताचा काळाबाजारया प्रकारावरून संबंधितांनी अनुदानित रासायनिक खताचा काळाबाजार करून अकृषक वापरासाठी अवैध विक्री केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच शासनाचे अनुदान लाटून शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने संबंधित कृषी सेवा केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.