Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Protest : तरूण दूध उत्पादकांच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Dairy Farmer : दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये दर मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी गणोरे (ता. अकोले) येथे शुभम आंबरे व संदीप दराडे या दूध उत्पादक तरुण शेतकऱ्यांनी १ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले.

Team Agrowon

Nagar News : दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये दर मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी गणोरे (ता. अकोले) येथे शुभम आंबरे व संदीप दराडे या दूध उत्पादक तरुण शेतकऱ्यांनी १ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणाचा शनिवारी (ता.६) सहावा दिवस असतानाही अजून प्रशासनाचे अधिकारी तसेच राजकीय नेतेही फिरकले नाहीत.

त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी चौकात एकत्र येऊन निषेध व्यक्त केला, तसेच दुग्धविकासमंत्री आल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.

गाईच्या दुधाला अनुदान न देता प्रति लिटर चाळीस रुपये दर द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी कालपासून गणोरे येथील मुख्य चौकात शुभम आंबरे व संदीप दराडे या दूध उत्पादक तरुण शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आतापर्यंत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार किरण लहामटे यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. शनिवारी या उपोषणाचा सहा दिवस होता.

दोन्ही उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर होत आहे. सहाव्या दिवशीही प्रशासनातील कोणीही उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. शुक्रवारी रात्री गणोरे परिसरातील नागरिकांनी सरकार आणि दुग्धविकास मंत्र्याच्या भूमिकेचा निषेध केला.

११ गावांत बंद

गणोरे येथे दूध दरासाठी शुभम आंबरे व संदीप दराडे यांच्या उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारचा निषेध करत शनिवारी गणोरेसह परिसरातील पिंपळगाव निपाणी, हिवरगाव, डोंगरगाव, समशेरपूर, गुंजाळवाडी, वडगाव लांडगा आदीसह ११ गावांत शुक्रवारी बंद पाळून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Bank: कोल्हापूर जिल्हा बँकेकडून शेतकरी, व्यावसायिकांसाठी विविध योजना; शैक्षणिक कर्जाचा व्याजदर १२ वरून ८ टक्क्यांवर

Irrigation Project: विदर्भ, मराठवाड्यातील शेती आणि पाणीटंचाईचा प्रश्न दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला गती; ९८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Chia Farming : बदलत्या हवामानात चिया पीक देईल आर्थिक स्थैर्य

Illegal Liquor Shop : दारूबंदीसाठी महिलांचे आंदोलन

Rabi Jowar Variety : रब्बी ज्वारी लागवडीसाठी वाण

SCROLL FOR NEXT