Milk Rate Issue : गणोरे गावात सुरू असणाऱ्या दूध दराच्या आंदोलनाचे बळ वाढले; ११ गावांचा पाठींबा 

Milk Farmer Hunger Strike : दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दर मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. अहमदनगर जिल्ह्यासह विविध जिल्ह्यात सरकारचा निषेध नोंदवला जात आहे. 
Milk Rate
Milk RateAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला ४० रूपये दराची मागणी केली आहे. यामागणीसाठी राज्यभर आंदोलने केली जात आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात दुधाच्या दरावरून आंदोलनांनी रान उठवले आहे. सध्या खासदार निलेश लंके देखील जनआक्रोश आंदोलनातून दुधाला ४० दर देण्याची मागणी करत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून अकोले तालुक्यातील गणोरे गावात सुरू असणाऱ्या  बेमुदत उपोषणाचा सहावा दिवस आहे. यावेळी संदीप दराडे या उपोषणकर्त्याने सरकारवर टीका केली आहे. तर दुधाच्या प्रश्नावरून पाठबळ देणाऱ्या गावांची संख्या वाढत असल्याचे म्हटले आहे. तर दूध दराच्या प्रश्नावरून उपोषण करणाऱ्या तरूणांसाठी परिसरातील गावे एकवटली आहेत. 

Milk Rate
Raju Shetti On Milk Rate : राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात नगरमध्ये जोरदार आंदोलन; ४० रू दर देण्याची मागणी

सरकारने दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये दर द्यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी गणोरे (ता. अकोले) येथे सोमवारपासून (ता. १) उपोषण सुरू आहे. शुभम आंबरे व संदीप दराडे या दूध उत्पादक तरुण शेतकऱ्यांनी दूध दरावरून उपोषण सुरू केले आहे. तर त्यांच्या या उपोषणाला आता परिसरातील इतर गावांचा पाठिंबा वाढत आहे. 

दुधप्रश्न मार्गी लावल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसण्याचा इशारा याआधीच या तरूणांनी सरकारला दिला आहे. तर आता दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपोषणस्थळी आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. 

Milk Rate
Nilesh Lanke : 'भीक नको, हक्काचं द्या'; लंके यांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

तर आता या उपोषणाला परिसरातील शेतकरी दूध उत्पादकांनी पाठिंबा दिला असून गावांची संख्या वाढत आहे. यादरम्यान गणोरे गावासह पंचक्रोशीतल्या ११ गावांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनास पाठिंबा दिला आहे. यामध्ये गणोरे, हिवरगाव, विरगाव, पिंपळगाव, वडगाव लांडगा, कळस, डोंगरगाव, समशेरपूर, देवठाण, गुंजाळवाडी, सावरगाव पाट या गावांचा समावेश आहे. 

जनआक्रोश आंदोलनाचा दुसरा दिवस

दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी जनआक्रोश आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. तर प्रशासनाने या आंदोलनाकडे कानाडोळा केला असून सरकारचा प्रशासनावर दबाव असल्याची टीका लंके यांनी केली आहे.  

नेवासात उपोषण मागे 

यादरम्यान नगर जिल्ह्यातील नेवासा येथे दुध दरावरून सुरू असणारे उपोषण मागे घेण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संसदेत दुधाला हमीभाव मिळवून देण्यासाठी आवाज उठवू असे आश्वासन यावेळी दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com