Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seeds : नगर जिल्ह्यात कापसाचे पुरेसे बियाणे उपलब्ध

Agriculture Department : नगर जिल्ह्यात यंदा कापसाच्या वेगवेगळ्या वाणाचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. बियाण्यांची कमरता नाही, पुरेसा पाऊस होत असल्याने बियाण्यांची विक्रीही जोरात आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात यंदा कापसाच्या वेगवेगळ्या वाणाचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. बियांणयांची कमरता नाही, पुरेसा पाऊस होत असल्याने बियाण्यांची विक्रीही जोरात आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे. कुठे जर अधिक दराने बियाणे विक्री होत असेल तर कळवा, परंतु ठरावीक वाणांची मागणी करू नये असे अवाहन कृषी विभागाने केले आहे.

नगर जिल्ह्यात पूर्वी कापसाचे क्षेत्र कमी होते. दहा वर्षांपासून त्यात वाढ होत आहे. आता नगर, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, कर्जत, जामखेड, पारनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यांत कापसाची लागवड होत आहे. संगमनेर, श्रीगोंदा तालुक्यांतही हळूहळू कापसाचे क्षेत्र वाढत आहे.

गेल्या वर्षी दीड हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा दीड लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने बियाणे मागणीचे नियोजन केले होते. यंदाकापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे.

कृषी विभागाने कापसाच्या विविध वाणांच्या सहा लाख पाकिटाची मागणी केली होती. त्याप्रमाणे पुरवठा झाला. जवळपास पाच लाख पाकिटांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. नेवासा तालुक्यात अधिक दराने विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

‘ती पाकिटे कोणाला विकली?’

जिल्ह्यात यंदा साडेसहा लाख पाकिटे उपलब्ध झाली. त्यात शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या त्या वाणाची एक लाखापेक्षा अधिक पाकिटे उपलब्ध झाली. ठरावीक वाणाची मागणी करू नये, असे सातत्याने कृषी विभाग सांगत आहे. मात्र उपलब्ध झालेल्या त्या वाणांची पाकिटे कोणाला विकली, त्याची नोंद आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच वाणाची जास्ती दराने विक्री केली असल्याचा कृषी विभागाला संशय आहे. शेतकरीही स्वतःच अधिक दराने खरेदी करतात व तक्रार करत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT