Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde : कृषी विद्यापीठांचे उपक्रम सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचावेत : धनंजय मुंडे

Agricultural Universities : कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत असते. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. मात्र कृषी विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या उपक्रम, संशोधनाची माहितीच होत नसल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे समोर आल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Team Agrowon

Agricultural Yojana : सर्व कृषी विद्यापीठांमधील शेतीविषयक उपक्रम आणि कार्यक्रमांबाबत माध्यमांना माहिती द्यावी, असे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. एरवी फटकून राहणाऱ्या कृषी विद्यापीठांचे उपक्रम सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचावेत, या साठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हा आदेश दिला आहे. याबाबत कृषी विभागाने परिपत्रक काढून सर्व विद्यापीठांना सूचना दिली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या विद्यापीठातील दैनंदिन घडामोडी, कार्यक्रमांबाबत माध्यमांना माहिती दिली जात नाही. त्याबाबतची पूर्वसूचनाही दिली जात नाही. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी दिली जात नाही. कार्यक्रम झाल्यानंतरही त्याला प्रसिद्धी मिळावी, यासाठी तत्परता दाखविली जात नाही.

कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत असते. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. मात्र कृषी विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या उपक्रम, संशोधनाची माहितीच होत नसल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे समोर आल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

त्यामुळे कृषी विद्यापीठांतील विविध घडामोडींबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच विद्यापीठांमार्फत केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या संशोधन व उपक्रमांना शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी माध्यमांना माहिती द्यावी, असे आदेश दिले आहेत.

शासनाच्या धोरणास अनुसरून होणारे कार्यक्रम, घडामोडी यांची पूर्वसूचना देण्याबरोबरच कार्यक्रम झाल्यानंतर प्रसिद्धीची व्यवस्था करावी. तसेच विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपर्कात राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

‘ॲग्रोवन’सारख्या कृषी क्षेत्राला वाहिलेल्या दैनिकाबरोबरच काही माध्यमे कृषी विषयक बातम्या देत असतात. मात्र संशोधन, उपक्रम आणि हवामान बदलासंदर्भात माहिती देण्याबाबत कृषी विद्यापीठांची अनास्था असल्याने त्यांना माध्यमांना माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. यापुढील काळात त्यांच्याकडून अहवालही घेतला जाईल.
- धनंजय मुंडे, कृषिमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT