Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पाणीटंचाईवर उपाययोजना सुरू

Water Shortage : राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर टँकर सुरू असलेल्या जिल्ह्यांना एकूण १९.५३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.

Team Agrowon

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर टँकर सुरू असलेल्या जिल्ह्यांना एकूण १९.५३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तसेच संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिल्या आहेत.

राज्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ पुढील नियोजनासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांत पाऊस कमी झाल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

राज्यात २० नोव्हेंबर पर्यंत राज्यातील १० जिल्ह्यांतील ३५५ गावे व ९५९ वाड्यांमध्ये ४५ शासकीय व ३३२ खासगी, अशा एकूण ३७७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकर सुरू असलेल्या १० जिल्ह्यांपैकी ८ जिल्ह्यांना एकूण १९.५३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना

प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणारी गावे / वाड्या निश्‍चित करून संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्याशी विचार विनिमय करून ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून अशा तीन स्वतंत्र तिमाहीसाठी टंचाई कृती आराखडे तयार करण्यात येतात.

टंचाई निवारणाकरिता पुढील अनुज्ञेय उपाययोजनांपैकी योग्य त्या उपाययोजनेची निवड करण्याच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. बुडक्या घेणे, विहीर खोल करणे, विहिरीतील गाळ काढणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, टँकर, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, प्रगतिपथावरील पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरी घेणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, धरणामध्ये अथवा तलावामध्ये चर खणणे तसेच टँकर मंजुरीचे जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार आवश्यकतेनुसार संबंधित उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनाही प्रदान करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन

Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

Animal Feed : चारा-पाण्याचा प्रश्न खानदेशात सुटण्याचे संकेत

Cotton Crop Disease: लाखेगाव, अलीपुरातील कपाशी पिकावर ‘मर’ रोगाचा फटका

SCROLL FOR NEXT