Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : तीस रुपये दर न देणाऱ्या दूध संकलन केंद्रावर कारवाई

Team Agrowon

Nagar News : दूधसंकलन केंद्रावर दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना ३० रुपये प्रतिलिटर दर देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जे केंद्र शेतकऱ्यांना ३० रुपयांचा दर देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. तसेच दूध भेसळखोरांवरही कठोर कारवाई करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.

नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दूधभुकटी अनुदान योजना तसेच जिल्हास्तरीय दूध भेसळ समितीची आढावा बैठक झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह दूध संकलन केंद्राचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की नगर जिल्ह्यातील प्रत्येक दूध संकलन केंद्रावर उच्चप्रतीच्या दुधाचे संकलन करण्यात यावे. दुधाच्या गुणवत्तेमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही. जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण विभागामध्ये दुधाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी पथक स्थापन करण्यात येऊन त्यामार्फत दुधाची तपासणी करण्यात यावी.

तपासणीदरम्यान दुधामध्ये भेसळ आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच दूधसंकलन केंद्रावर दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना ३० रुपये प्रतिलिटर दर देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जे केंद्र शेतकऱ्यांना ३० रुपये इतका दर देणार नाहीत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश विखे पाटील यांनी दिले आहेत.

‘...अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई’

‘‘प्रत्येक दूध संकलन केंद्रावर संकलित होणाऱ्या दुधाची माहिती मिळावी यासाठी विशेष ॲप तयार करावे. समाजातील प्रत्येकाला उच्चप्रतीचे व भेसळमुक्त दूध मिळावे याला शासनाचे प्राधान्य आहे. जिल्ह्यात दूध संकलित करण्यात येणाऱ्या दूध संकलन केंद्राची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करावी. भेसळयुक्त दूध आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी,’’ असे आदेश दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT