grampanchayat  Agrowon
ॲग्रो विशेष

Grampanchayat Scam : बनावट दस्त बनविणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यावर कारवाई

Forging Document : ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायतीच्या मालकीची मिळकत स्वतःच्या नावे असल्याचा बनावट हस्तलिखित उतारा बनवून ती जागा एका मेडिकलला भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आला.

Team Agrowon

Nashik News : सिन्नर तालुक्यातील घोटेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायतीच्या मालकीची मिळकत स्वतःच्या नावे असल्याचा बनावट हस्तलिखित उतारा बनवून ती जागा एका मेडिकलला भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आला.

याबाबत संबंधित सदस्यावर बनावट दस्तप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घोटेवाडीची मिळकत क्र.१८५ /१५/२ आपल्या नावे असल्याचा नमुना ८ चा बनावट उतारा गोरक्षनाथ घोटेकर याने बनवला. उतारा वापरून त्याने शंभू मेडिकल यांच्याशी सिन्नरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात २८ जुलै २०२१ ला लिव्ह ॲन्ड लायसन्स करारनामा केला. ही बाब तक्रारकर्ते प्रवीण घेगडमल आणि जितेंद्र घोटेकर यांनी माहिती अधिकारात उजेडात आणली.

त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कागदपत्रांच्या पुराव्यानिशी तक्रार केली. सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला. त्यात संबंधित जागेच्या हस्तलिखित उताऱ्यावर आपले हस्ताक्षर आणि स्वाक्षरी नसल्याचा लेखी जबाब ग्रामसेवक संदीप वाकचौरे यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT