Sugar Market Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखरविक्री कारखान्यांच्या अंगलट

Sugar Industry : केंद्र सरकारने दिलेल्या कोट्याइतकीच साखर विका असे वारंवार सांगूनही कारखानदार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : केंद्र सरकारने दिलेल्या कोट्याइतकीच साखर विका असे वारंवार सांगूनही कारखानदार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे कोट्यापेक्षा जादा साखरविक्री करून नफा मिळविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या देशातील तब्‍बल १०६ कारखान्यांचा जूनचा साखर विक्री कोटा कमी करत केंद्र सरकारने या कारखान्यांना दणका दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र सरकारने कारवाईचे सत्र सुरू केले होते. या महिन्यात जादा कारखान्यांचा कोटा घटविला.

जुलैमध्ये देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी ५७३ कारखान्यांना २४ लाख टन साखरेचा कोटा दिला आहे. विक्रीचा हिशेब न देणाऱ्या ६० ते ६५ कारखान्यांचा कोटा गेल्या दोन महिन्यांत कमी केला होता. या महिन्‍यात मात्र कारवाई तीव्र करताना १०६ कारखान्यांनाचा कोटा घटविला आहे.

जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५, साखर (नियंत्रण) आदेश, १९६६ च्या कलम ४, ५ आणि भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या कलम ३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ही कारवाई सरकारने केल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

देशात साखरेचे दर नियंत्रित राहावे, प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त साखर बाजारात येऊन साखर दराचा आलेख वाढू नये यासाठी केंद्राच्या वतीने गेल्या वर्षभरापासून विक्रीवर नियंत्रण आणले जात आहे.

अन्‍न व नागरी पुरवठा मंत्रालयाने साखर कारखान्यांना नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम (NSWS) या पोर्टलवर जीएसटी बिलासहित साखर विक्रीची माहिती भरण्यास सांगितली आहे. पण अनेक कारखान्‍यांनी ही माहिती भरताना त्यात प्रामाणिकपणा दाखवला नाही.

उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदा एप्रिलला साखरेला चांगली मागणी राहिली. यामुळे या कालावधीत दरात वाढ राहिली. याचा फायदा घेत कारखान्यांनी जादा साखरेची विक्री केली. केंद्र सरकारने दिलेल्या कोट्‍याचे उल्लंघन करीत कारखान्यांनी साखर विक्री केली.

केंद्र सरकारने घेतलेल्या आढाव्यात कारखान्यांची मखलाशी लक्षात आल्यानंतर केंद्राने दोषी कारखान्यांवर कोटा घटविण्याची कारवाई केली. कोटा घटविण्‍याबाबत केंद्राने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.

सुधारणा करा; अन्यथा कारवाई अटळ

कारखान्‍यांना इशारा देताना केंद्र सरकारने म्हटले आहे, की १० जूलैपर्यंत कारखान्यांनी जूनची माहिती भरली नाही तर अशा कारखान्यांचा ऑगस्टचा कोटाही कमी करण्यात येईल. अशा प्रकारची कारवाई प्रत्येक महिन्यात सुरूच रहाणार असल्याने अशा कारखान्यांनी त्यांच्यात सुधारणा करावी, अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा देण्यात आल्याचे अन्‍न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT