Orange Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Procurement : अचलपूर बाजार समिती करणार संत्रा खरेदी

Team Agrowon

Amaravati News : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने संत्रा बागायतदारांना एका खासगी कंपनीच्या सहकार्याने हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे आता संत्रा शेतकऱ्यांना खासगी संत्रा मंडीच्या भरवशावर अवलंबून राहावे लागणार नाही. अचलपूर तालुका हा सर्वाधिक संत्रा लागवड क्षेत्र असलेला आहे.

या भागात जवळपास १ हजार हेक्‍टरच्या वर संत्रा लागवड आहे. मात्र सर्वाधिक मोठी बाजार समिती असून सुद्धा या ठिकाणी बाजार समित्यांच्या माध्यमातून संत्रा खरेदी-विक्रीचा पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध नव्हता त्यामुळे नाइलाजाने संत्रा शेतकऱ्यांना खासगी मंडीमध्येच संत्रा विक्री करावी लागत होते. त्या ही अडचण दूर करण्यासाठी पहिल्यांदाच अचलपूर बाजार समितीकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

हैदराबाद येथील फ्रूटेक्‍स ही कंपनी विविध फळांमध्ये काम करते. याच कंपनीद्वारे अचलपूर बाजार समितीच्या माध्यमातून संत्रा खरेदीवर भर दिला जाणार आहे. बाजार समितीकडून पहिल्यांदाच याप्रकारची विक्री व्यवस्था शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांकडून आलेल्या फळांचे ग्रेडिंग केले जाणार आहे.

त्यानंतर खुला लिलाव पद्धतीने व्यापारी दर ठरवतील. त्यानुसार संत्रा खरेदीसाठी बाजार समितीने फ्रूटेक्‍स कंपनीला जागा उपलब्ध करून दिली असून, त्या ठिकाणी कंपनीने ग्रेडिंगसाठीची यंत्रणा बसविली आहे. बाजार समितीचे सभापती सभापती राजेंद्र गोरले, उपसभापती अमोल चिमोटे संचालक भावेश अग्रवाल, अजिंक्य अभ्यंकर, पोपट घोडेराव, कैलास आवारे तर कंपनीकडून रमेश राऊत, कपिल चंदेल, राजकुमार यांनी ही माहिती दिली.

६० टनांपासून सुरुवात

कंपनीच्या वतीने बाजार समितीच्या यार्डमध्ये ग्रेडिंगसाठीची यंत्रणा बसविली आहे. सुरुवातीला कंपनीकडून ६० टन खरेदीपासून सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिसादानंतर ही क्षमता दोनशे टनांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक राऊत यांनी दिली आहे.

निःशुल्क कॅरेट पुरविणार

कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बागेतील संत्रा खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे संत्रा कॅरेट कंपनीकडून निःशुल्क पुरविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे छोट्या संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

अवघ्या दीड तासात खात्यात पैसे

शेतकऱ्यांनी संत्रा विकल्यानंतर शेतकऱ्यांची केवायसी झालेली असल्यास अवघ्या दीड तासात त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. जर काही टेक्निकल समस्या निर्माण झाली तरच पैसे खात्यात जमा होण्यास विलंब होऊ शकतो अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यात दीड तासात पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली.

छोट्या संत्रा बागायतदार समोर विक्रीचा पर्यायच नव्हता. माल कमी असल्याने व्यापारी बागांकडे फिरकत नव्हते. बागायतदारांना विक्रीचा पर्याय या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. यामुळे संत्रा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे तर बाजार समितीलाही लाभ होणार आहे.
- राजेंद्र गोरले, सभापती, बाजार समिती, अचलपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Warna Sugar Factory : ‘वारणा कारखाना जतला सौरऊर्जा प्रकल्प उभारणार’

Nashik DCC Bank : पीककर्ज, सक्तीच्या वसुली विरोधात शेतकरी संतप्त

Salary of Kotwal : कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत ३८ लोककल्याणकारी निर्णय

Jowar Procurement : हमीभावाने ज्वारी खरेदीस आज शेवटची मुदत

SCROLL FOR NEXT