Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Update : उमरग्यात आंतरमशागतीच्या कामांना वेग

Agriculture Sowing : मॉन्सूनपूर्व व नंतरच्या पावसाने पेरणीच्या कामाला गती मिळाल्याने पेरण्या वेळेत झाल्या. पेरणी केलेले क्षेत्र बहरात येत आहे.

Team Agrowon

Umraga News : मॉन्सूनपूर्व व नंतरच्या पावसाने पेरणीच्या कामाला गती मिळाल्याने पेरण्या वेळेत झाल्या. पेरणी केलेले क्षेत्र बहरात येत आहे. मात्र, नेहमीप्रमाणे पिकावरील रोगराईच्या प्रादुर्भावाची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

तालुक्यात कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, त्यासाठी निसर्गाची वेळेत साथ महत्त्वाची असते. यंदा रोहिणी व मृग नक्षत्रातील पावसाची सुरवात वेळेत सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी उथळ, डोंगराळ व हलक्या जमिनीत पेरणीला प्राधान्य दिल्याने तेथील पिके बहरत आहेत. थोड्या विलंबाने पेरणी झालेल्या क्षेत्रातीलही पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होत आहे.

दरम्यान, तालुक्यातील खरीप हंगामातील पेरणी यंदा वेळेवर सुरू झाली आहे. तालुक्यातील सरासरी पेरणी क्षेत्र ७५ हजार ५४ हेक्टर होते. त्या सर्व क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्यात सोयाबीनचे ३५ हजार २०० हेक्टर सरासरी क्षेत्र होते, त्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

जून महिन्यात जास्त पाऊस

जून महिन्याची पावसाची अपेक्षित सरासरी ११०.७ मि.मी आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्याने पेरणीला गती मिळाली. या महिन्यात प्रत्यक्षात पाऊस २७३ मिमी (२४६ टक्के) झाला. दरम्यान, जुलै महिन्यात एक ते सात तारखेपर्यंत पिकाच्या वाढीसाठी चांगला पाऊस झाला आहे. उमरगा महसूल मंडळात ५३.७, दाळींब महसूल मंडळात ५७.१, नारंगवाडी महसूल मंडळात ४२.२, मुळज महसूल मंडळात ६२.३, तर मुरूम महसूल मंडळात ३६.७ असा एकूण ५०.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव

पाऊस वेळेत झाल्याने शेतकऱ्यांनी पदरमोड करून पेरणी केली. बियाणांची उगवणही चांगल्या प्रकारे झाली. परंतु, नेहमीप्रमाणे रोगराई पडण्याचा प्रकार दिसून येत आहे. सोयाबीनवर पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत भर पडली आहे. नियंत्रणासाठी करावयास लागणाऱ्या रासायनिक फवारणीमुळे उत्पादन खर्चात भर पडणार आहे.

पिकांच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मोठी मेहनत करावी लागत आहे. दरम्यान, तूर, उडीद, मूग, सोयाबीन या द्विदल पिकातही तण वाढल्याने शेतकऱ्यांनी कोळपणी सुरू केली आहे. खुरपणीसाठी अधिक खर्च येत असल्याने तणनाशक फवारणीला प्राधान्य दिले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT