संजय बडे, के. एच. शिरगापुरेImproved Varieties: रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. कोरडवाहू आणि कमी पर्जन्यमान असलेल्या भागांमध्ये रब्बी ज्वारी हे महत्त्वाचे अन्नधान्य पीक मानले जाते. पौष्टिक मूल्ये, कमी खर्चातील लागवड आणि प्रतिकूल हवामानात तग धरण्याची क्षमता यामुळे ज्वारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रब्बी हंगामामध्ये ज्वारी धान्यांचा व कडब्याचाही दर्जा चांगला मिळत असल्याने मोठ्या क्षेत्रावर ज्वारीची लागवड केली जाते. रब्बी ज्वारी लागवडीतून धान्य उत्पादनासह जनावरांना कडबा उपलब्ध होतो. ज्वारीच्या भाकरीला पौष्टिकतेमुळे विशेष मागणी आहे. .रब्बी ज्वारी लागवडीसाठी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या दरम्यानची शिफारस आहे. लागवडीसाठी ज्वारीच्या योग्य जातीची निवड करणे गरजेचे आहे. त्यासाठी संशोधन संस्था व विविध कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या जातींची गुण वैशिष्ट्ये माहिती असणे आवश्यक आहे..Dryland Farming: कोरडवाहू शेतीतील जोखीम कमी तंत्रज्ञानातून जोखीम व्यवस्थापन.लागवड नियोजनरब्बी ज्वारी लागवड १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण करावी.कोरडवाहू क्षेत्रासाठी पावसाच्या ओलीवर ५ सें.मी. खोलीपर्यंत ४५ बाय १५ सें. मी. अंतरावर पेरणी करावी.हेक्टरी रोपांची संख्या १.४८ लाख इतकी असावी.साधारणपणे दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करावी.पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे पुरेसे होते..वाण निवडफुले यशोमतीवाण अवर्षण प्रवण भागात हलक्या जमिनीसाठी योग्य.परिपक्वता कालावधी ः ११० ते ११५ दिवस.खोडमाशीस प्रतिकारक.धान्य उत्पादन ः हेक्टरी ९ ते ११ क्विंटल, कडबा उत्पादन ः हेक्टरी ४० ते ५० क्विंटलया ज्वारीची भाकरी चवदार व गोड लागते..फुले अनुराधाहलक्या जमिनीत लागवडीस योग्य.पक्व होण्याचा कालावधी ः १०५ ते ११० दिवस.भाकरी व कडब्याची प्रत उत्तम.धान्य उत्पादन ः हेक्टरी ८ ते १० क्विंटल, कडबा उत्पादन ः हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल..फुले सुचित्राअवर्षण प्रवण भागात मध्यम जमिनीसाठी शिफारशीत.पक्व होण्याचा कालावधी ः १२० ते १२५ दिवस.दाणे मोत्यासारखे पांढरे शुभ्र असून भाकरीची चव उत्तम.खोडमाशी, पानांवरील रोग व खोडकिडीस प्रतिकारक वाण.कोरडवाहूमध्ये सरासरी धान्य उत्पादन ः हेक्टरी २४ ते २८ क्विंटल, कडबा उत्पादन ः हेक्टरी ६० ते ६५ क्विंटल..Sunflower Cultivation: नियोजन उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे....परभणी मोतीपरभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून विकसित.मराठवाडा विभागासाठी शिफारशीत वाण.भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य.टपोरे मोत्यासारखा दाणा, कडबा प्रत उत्तम.पक्व होण्याचा कालावधी ः १२० ते १२५ दिवस.धान्याचे उत्पादन ः हेक्टरी १८ ते २० क्विंटल, कडबा उत्पादन ः हेक्टरी ६५ ते ७५ क्विंटल..परभणी सुपर मोतीपक्व होण्याचा कालावधी ः ११८ ते १२० दिवस.धान्य उत्पादन हेक्टरी ३२ क्विंटल..परभणी शक्तीभारी जमिनीत लागवडीस योग्य.पक्व होण्याचा कालावधी ः ११८ ते १२० दिवस.कडबा उत्पादन हेक्टरी ४५ ते ६५ क्विंटल, धान्य उत्पादन ः हेक्टरी २१ ते २४ क्विंटल.परभणी ज्योतीपक्व होण्याचा कालावधी ः १२५ ते १२० दिवसउंच वाढणारा पण जमिनीवर न लोळणारा वाण.मावा किडीस प्रतिकारक्षमओलिताखाली घेण्याची शिफारसधान्य उत्पादन हेक्टरी ३८ ते ४० क्विंटल, कडबा उत्पादन ः हेक्टरी ८८ ते ९० क्विंटल.दाण्याची व कडबा प्रत उत्तम..फुले वसुधाभारी जमिनीकरिता कोरडवाहू, बागायतीसाठी लागवडीस योग्य.पक्व होण्याचा कालावधी ः ११६ ते १२० दिवस.दाणे मोत्यासारखे पांढरे शुभ्र व चमकदार.भाकरी व कडब्याची प्रत उत्तम.धान्य उत्पादन ः हेक्टरी २५ ते २८ क्विंटल, कडबा उत्पादन ः हेक्टरी ५५ ते ६० क्विंटल..फुले मधुरखास हुरड्यासाठी विकसित ज्वारी जात.मध्यम ते भारी जमिनीकरिता शिफारस.या जातीचा हुरडा ९५ ते १०० दिवसांत तयार होतो.हुरडा उत्पादन ः हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल.हुरडा चवीला उत्कृष्ट व अधिक पाचक..फुले पंचमीखास लाह्यांसाठी विकसित जात.मध्यम ते भारी जमिनीत लागवडीस योग्य.ही जात ११५ ते १२० दिवसांत तयार होते.लाह्या होण्याचे प्रमाण ८७.४ टक्के.धान्य उत्पादन ः हेक्टरी १२ ते १४ क्विंटल..फुले रेवतीभारी जमिनीकरिता बागायतीसाठी शिफारशीत.दाणे मोत्यासारखे पांढरे व चमकदार.परिपक्वता कालावधी ः ११८ ते १२० दिवस.धान्य उत्पादन ः हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल, कडबा उत्पादन ः हेक्टरी ९० ते १०० क्विंटलखोडमाशीस प्रतिकारक.- संजय बडे, ७८८८२९७८५९- के. एच. शिरगापुरे, ९५४५६९५१४१(कृषिविद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.