Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : जुन्नरच्या आदिवासी भागात भातकापणी, झोडणीच्या कामांना वेग

Paddy Crop : दिवाळीतील भाऊबीज झाल्यानंतर जुन्नरच्या आदिवासी भागात भात कापणी व झोडणीच्या कामांनी वेग घेतला आहे. सध्या सगळीकडे भात कापणीची लगबग सुरू आहे.

Team Agrowon

Pune News : दिवाळीतील भाऊबीज झाल्यानंतर जुन्नरच्या आदिवासी भागात भात कापणी व झोडणीच्या कामांनी वेग घेतला आहे. सध्या सगळीकडे भात कापणीची लगबग सुरू आहे. काही शेतकरी भात कापणीबरोबर भात झोडणी देखील करतात.

मोठे भात उत्पादक मजुरांच्या तुटवड्यामुळे कापलेला भात पीक रचून ठेवतात. नंतर सोयीप्रमाणे झोडणी करतात. आदिवासी भागात याला भात बडवणी देखील म्हणतात. अवकाळी पावासामुळे भाताचे काही अंशी नुकसान झाले आहे. विशेषतः हळव्या वाणांना याचा फटका बसला आहे.

ऐन काढणीच्या वेळी भात काही प्रमाणात जमिनीवर आडवे झाले तरी देखील यावर्षी वेळीच झालेला पाऊस व कीड नियंत्रण झाल्याने भाताचा दर्जा उत्तम आहे. जुन्नरचा आदिवासी भाग भाताचे आगर समजला जातो. आदिवासी शेतकऱ्यांची वर्षभराची बेगमी भातपिकावरच अवलंबून आहे.

सगळीकडे पिवळ्या धमक शेतातून भातपिकाचा सुगंध दरवळला आहे. इंद्रायणी, आंबेमोहोर, खडक्या, रायभोग, बासमती, झिनी कोलम तसेच इतर हळवे व संकरित वाण देखील घेतले जातात. यावर्षी पिकाचा उतारा चांगला आहे.

निवडणुकीमुळे मजुरांचा तुटवडा

सद्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे, तरुण कार्यकर्ते प्रचारात गुंतले असल्याने मजुरांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. मजुरीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ठाकर समाजाचे मजूर टोळ्या करून भात कापणी करत असल्याचे खटकाळे गावचे प्रगतशील शेतकरी रावजी तळपे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT