Jowar Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Harvesting : भूम तालुक्यामध्ये ज्वारीच्या काढणीला वेग

Rabi Jowar : भूम तालुक्यामध्ये ज्वारीच्या काढणीला वेग आला असून सध्या तालुक्यासह परिसरात ज्वारीचे पीक जोमात असून काही प्रमाणात का होईना चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : भूम तालुक्यामध्ये ज्वारीच्या काढणीला वेग आला असून सध्या तालुक्यासह परिसरात ज्वारीचे पीक जोमात असून काही प्रमाणात का होईना चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे. यंदा भूम तालुक्यामध्ये ज्वारीची पेरणी सरासरीपेक्षा कमी झाली होती. परंतु पुन्हा पाऊस पडल्याने थोडेफार प्रमाणात ज्वारीचे क्षेत्र वाढले.

तालुक्यामध्ये एकूण पशुधनाची संख्या १,२४,६२० एवढी पशुधनाची संख्या असून ९५३२७ पशुधन घटकाची संख्या आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये रब्बीच्या वेळी ज्वारीची पेरणी जास्त केली जाते.

ज्वारीच्या कडब्याला (चाऱ्याला) जास्त मागणी असते. यंदा पाऊस कमी पडल्यामुळे व पुढील काळामध्ये चाराटंचाई होऊ नये म्हणून पशूधन उपायुक्त यांनी दि. ३१ जानेवारीपासून जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी घालण्यात आले आहे.

जिल्ह्यात २०२३ - २४ मध्ये सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.तसेच जिल्ह्यातील वाशी,धाराशिव व लोहारा हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहे.

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी, धाराशिव यांचेद्वारे महाराष्ट्र वैरण (निर्यात नियंत्रक) आदेश २००१ मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील गुरांचा चारा / गवत / वैरण जिल्ह्याबाहेर अन्यत्र वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

यासाठी जिल्ह्यातील सर्व चारा उत्पादक,पशुपालक व चारा व्यावसायिकांनी जिल्ह्यातील पशुधनाच्या आवश्यकतेस विचारात घेऊन जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक वा विक्री करु नये.असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.

भूम तालुक्यातील ज्वारीचा चारा इतर ठिकाणी न विकता शेतकऱ्याच्या स्तरावर किंवा गाव पातळीवर चारा गावातील पशुधनास उपयोगात आणल्यास चारा टंचाईची तीव्रता कमी होईल.

चारा इतर जिल्ह्यात न गेल्यास जिल्हा सह तालुक्यामध्ये पशुधनाला चारा उपलब्ध होईल. पुढील काळातील चारा टंचाई पासून काही प्रमाणात फायदा होईल. जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये पशुधनासह पशुधन घटकांची संख्या जास्त असल्या कारणाने व पाऊस कमी पडल्याने यावर्षी चारा टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने जिल्ह्यामधील चारा इतरत्र न जाता जिल्ह्यामध्येच पशुधनाला उपलब्ध झाला, तर जिल्ह्यातील पशुधन पालकांना याचा फायदा होणार आहे.

भूम तालुक्यातील पशुपालकांनी जुलैपर्यंत पुरेल एवढ्या चाऱ्याचे सु नीयोजन करणे पशुपालकांच्या हिताचे राहील.
- डॉ. दत्तात्रय इंगोले, पशुसंवर्धन अधिकारी भूम.
भूम तालुक्यातील चारा उत्पादक शेतकऱ्यांनी इतर जिल्ह्यात चारा न विकता भूम तालुक्यातील पशुधन पालकांना चारा विकल्यास चारा टंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे.
- दीपक हरकुडे, पशुधनपालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Damage: सातपुड्याच्या पायथ्याच्या केळी बागा जमीनदोस्त

Nangarat Literature Festival: जयसिंगपुरात रविवारी तिसरे ‘नांगरट’ साहित्य संमेलन

Diwali Magazine Award: ‘सकाळ माध्यम समूहा’च्या दिवाळी अंक संचाला पुरस्कार

Donald Trump Warning: लेबनॉनवरील हल्ला नेतान्याहू यांनी टाळला

Onion Seed Prices: कांदा बियाण्याला ६०० ते १२०० रुपयांपर्यंत दर

SCROLL FOR NEXT