Minister Ravindra Chavan Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Ravindra Chavan : जलसंधारण कामांची गती वाढवा

Jaljeevan Mission : जलसंधारण प्रकल्पांच्या कामांमध्ये प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबवून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे.

Team Agrowon

Jaljeevan Mission Sindhudurg News : जलसंधारण प्रकल्पांच्या कामांमध्ये प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबवून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. जिल्ह्यातील ३९ जलसंधारण कामांची गती वाढवावी, अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जलसंधारण, जलजीवन मिशन, भूसंपादन प्रक्रिया, तिलारी प्रकल्प आदींसह विविध विकासकामांचा आढावा घेतला.

या बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, शंकर बर्गे, अविशकुमार सोनोने, दिलीप पवार, सुहास गायकवाड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री चव्हाण म्हणाले, की जिल्ह्यात ३९ जलसंधारण प्रकल्पांची कामे प्रलंबित आहेत. शासनाने जलसंधारण कामांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे ज्या प्रकल्पांची कामे रखडली आहेत त्याठिकाणचे भूसंपादन करणे, शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देणे ही कामे अधिक गतीने व्हायला हवीत.

जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर कामेदेखील पूर्ण करा. जलजीवन मिशनअंतर्गत ४६५ योजनांचा ४३० कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या सर्व योजनांने कार्यारंभ आदेश देण्यात आले असून त्यातील ४९ कामे पूर्ण झाली आहेत. काही कामे प्रगतिप्रथावर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Torrent Project Controversy: ‘टोरंट’ वादळ

Sugarcane Price Announcement: ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी; ऊसदर संघर्ष समितीचा इशारा

Swabhimani Motorcycle Rally: ऊसदरासाठी ‘स्वाभिमानी’चे शक्तिप्रदर्शन; मोटारसायकल रॅलीमध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग

Agriculture Drought Management: दुष्काळात पाणी बचतीसह रब्बीचे नियोजन; कृषी विभागाकडून ७ हजार हेक्टरवर चारा उत्पादनाचा प्रस्ताव

Purandar Drought Condition: पुरंदर तालुक्यात दुष्काळाचे संकट; २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्र बाधित

SCROLL FOR NEXT