Soybean Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदतवाढीची सूचना ; आमदार अभिमन्यू पवार यांची माहिती

Soybean Purchase : सध्या राज्यात नाफेड आणि एनसीसीएफद्वारे हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू असून या हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रांची मुदत ३१ रोजी संपणार आहे.

Team Agrowon

Latur News : लातूर : सध्या राज्यात नाफेड आणि एनसीसीएफद्वारे हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू असून या हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रांची मुदत ३१ रोजी संपणार आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्री राहिल्याने सोमवारी (ता. २७) औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधून सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यासाठी विनंती केली.

मुख्यमंत्री फडणवीस व पणनमंत्री जयकुमार रावल यांनी परिस्थिती पाहून ८ ते १५ दिवसांनी हमीभाव सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची सूचना दिल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली. 

यासंदर्भात आमदार पवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव डॉ. श्रीकर परदेशी व सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांची भेट घेऊन पाठपुरावा केला असून यासंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी मुदतवाढीचे आदेश निर्गमित होणे अपेक्षित असल्याचे पवार यांनी सांगितले.

आतापर्यंत नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्याकडील सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांचे ३१ जानेवारीपर्यंत इतक्या कमी कालावधीत खरेदी करणे अशक्य आहे. हमीभाव खरेदी केंद्रांकडे वाढलेला शेतकऱ्यांचा कल पाहता अधिकाधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे.

त्यासाठी आमदार पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधून सदरील खरेदी केंद्राची मुदत वाढविण्यासाठी विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस व पणनमंत्री रावल यांनी परिस्थिती पाहून ८ ते १५ दिवसांनी हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रांची मुदत वाढविण्याची सूचना दिल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. लवकरच त्याबाबतचे आदेश निर्गमित होतील व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळेल, असेही आमदार पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Prices: 'रब्बी'तही खतांची चिंता! युरिया, 'डीएपी' १० ते १५ टक्क्यांनी महागणार; कारण काय?

Mid Day Meal: चार महिन्यांपासून इंधन, भाजीपाल्याचे अनुदान थकित

NABARD Insurance: शेतपिकांसह आता दूध उत्पादन, मत्स्यपालन क्षेत्रालाही विमा संरक्षण, काय आहे 'नाबार्ड'ची नवीन योजना

PM Kisan 21st Installment: पीएम किसानचा २१ वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट, 'या' शेतकऱ्यांना २ हजार मिळणार नाहीत

Panchayatraj Abhiyaan: महाश्रमदान मोहिमेत राबले हजारो हात!

SCROLL FOR NEXT