Sugarcane farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane farmer : नगरचा ऊस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला; मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? पोटे यांचाल सवाल

Prahar Organization On Sugarcane : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तर साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सहसंचालक, उपसंचालक हे सरकारी अधिकारी साखर कारखानदारांच्या दावणीला बांधलेले गेले आहेत, असा घणाघात प्रहार संघटनेने केला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील सर्वसामान्य शेतकरी शासनाच्या धोरणांमुळे भरडला जात आहे. यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतातील ऊस कारखान्याला घालून देखील एफआरपीसह ऊसाचे बिल मिळत नाही. यावरून २७ मे २०२४ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले होते. तसेच थकीत एफआरपी आणि व्याजासह ऊसाचे बिल कारखान्यांनी द्यावे, अशी मागणी केली होती. त्याला यश आले आहे. मात्र आंदोलनानंतरच प्रशासनासह कारखान्यांना जाग येत असेल तर मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? असा सवाल प्रहारच्या जिल्हाप्रमुख पोटे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच पोटे यांनी, जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तर साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सहसंचालक, उपसंचालक हे सरकारी अधिकारी साखर कारखानदारांच्या दावणीला बांधलेले गेले आहेत, असा घणाघात देखील केला आहे.

२७ मे रोजी प्रहार संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतुदी ३ व ३ (अ) नुसार तात्काळ थकीत एफआरपी आणि व्याजासह ऊसाचे बिल अदा करण्यात यावीत असा आदेश प्रादेशिक उपसंचालकांनी काढला होता. तसेच आदेशाची कार्यवाही करण्याबाबत सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना सांगण्यात आले होते.

त्यानंतर पोटे यांनी कारखान्यांना ५ जून २०२४ पर्यंतची मुदत दिली आहे. त्याप्रमाणे व्याज व थकीत ऊस बिल साखर कारखान्यांनी न दिल्यास दोषी कारखान्यांना आगामी गळीत हंगामाचे परवाने साखर आयुक्तांनी देवू नयेत, अशी मागणी केली आहे. तर प्रशासनाने दोषी कारखान्याना गळीत हंगामाचे परवाने दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पोटे यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखानदारांच्या चुकीच्या धोरणासह साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक, प्रादेशिक उपसंचालक यांच्यामुळे अडचणीत आला आहे. शेतकऱ्याला शेती करण्यासह घरगुती, वैद्यकीय, मुला-मुलींचे लग्न कार्य, शिक्षणासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत असून तो कर्जबाजारी झाल्याचा आरोप पोटे यांनी केला आहे.

तसेच सुलतानी अन्याय करणाऱ्या साखर कारखानदार आणि साखर आयुक्तालयाच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन प्रादेशिक सहसंचालक साखरा अहमदनगर आणि साखर आयुक्त कार्यालय साखर संकुल शिवाजीनगर पुणे येथे लवकरच ठिय्या व मुक्काम आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोटे यांनी दिला आहे. तर या आंदोलनासाठी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने संघटित व्हावे असेही आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख पोटे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT