Arvind Kejriwal Agrowon
ॲग्रो विशेष

Arvind Kejriwal Bail : केजरीवालांच्या जामिनामुळे ‘आप’ला मिळणार बूस्टर

Bail Update : ऐन लोकसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने केजरीवाल यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

Team Agrowon

New Delhi News : ऐन लोकसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने केजरीवाल यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्री. केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले असून त्यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे.

केजरीवाल यांच्या पक्षाचा सर्वाधिक प्रभाव हा दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांत आहे. सुदैवाने या दोन्ही ठिकाणी मतदानासाठी आणखी अवधी असल्याने ‘आप’ला तयारीसाठी वेळ मिळणार असून केजरीवाल या दोन्ही राज्यांत ताकदीने प्रचार करू शकतील.

आम आदमी पक्षासाठी हा बूस्टर डोस ठरेल, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. दिल्लीमध्ये ७ जागांसाठी २५ मे रोजी, तर पंजाबमध्ये १३ जागांसाठी येत्या १ जूनला मतदान होणार आहे. २१ मार्च रोजी केजरीवाल यांना कथित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली होती.

केजरीवालांना जामीन मिळाल्याचा मला आनंदच झाला आहे. लोकसभा निवडणुकीत याची आम्हाला मोठी मदत होणार आहे.
ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
केजरीवालांना मिळालेल्या अंतरिम जामिनाचे मी स्वागतच करतो. लोकशाहीसाठीच्या लढ्यामध्ये भारत ठामपणे उभा आहे.
शरद पवार, ज्येष्ठ नेते
हुकूमशाही राजवटीच्या विरोधात लढा देणाऱ्या केजरीवालांना मोठा दिलासा मिळाला असून देशामध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
आदित्य ठाकरे, ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा’चे नेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Junnar Gold Mango: ‘जुन्नर गोल्ड’ आंब्याला ‘शेतकरी वाण’ म्हणून मान्यता

Jowar Sowing: ज्वारीचा आतापर्यंत साडेनऊ लाख हेक्टरवर पेरा

Cotton Procurement: ‘सीसीआय’ वाढविणार कापूस खरेदीची मर्यादा

Pawata Crop: भोर, हवेली, मुळशीत गावरान पावट्याचा हंगाम बहरला

Leopard Alert: रांजणगावच्या औद्योगिक क्षेत्रात धडकला बिबट्या

SCROLL FOR NEXT