Agro Tourism  Agrowon
ॲग्रो विशेष

Tourism Policy : महिला उद्योजिकांना ‘आई’ चे पाठबळ

Team Agrowon

Nagpur News : पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने ‘आई’ पर्यटन धोरणाचा अवलंब केला आहे. यानुसार, महिला उद्योजिकांना विशेष सवलत देऊन प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातील महिला उद्योजिकांना पर्यटन विभागाने आवाहन केले आहे.

राज्यातून या योजनेसाठी नागपूर येथील महिला उद्योजकांकडून प्रस्ताव येत आहेत. महिलांना मिळणारे आर्थिक स्वातंत्र्य, गतिशीलता, त्यांचा उत्साह, महत्त्वकांक्षा आणि निर्णयक्षमतेचा फायदा घेत राज्यात दर्जेदार पर्यटनाला चालना देणे,

तसेच महिलांसाठी वैविध्यपूर्ण आणि शाश्वत आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणणे हे ‘आई’ या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. तसेच, याद्वारे महिलांना सुरक्षित, परवडणारी, शाश्वत आणि समृद्ध पर्यटनाची संधी उपलब्ध होणार आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळ यांसारख्या संस्थाबरोबर भागीदारी करण्यात आली आहे. एमएसआरएलएम, माविम आणि इतर संस्थांच्या साहाय्याने स्थापन झालेल्या महिलांच्या गटांच्या सहभागाने पर्यटनस्थळी लँडस्केप डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट, वारसा स्थळे आणि नैसर्गिक स्थळे जतन करणे, रिसॉट्समधील सुविधा व्यवस्थापन इ. सेवांसाठी महिला नेतृत्वात उपक्रमांना प्राधान्य देण्यात येईल.

हे धोरण यशस्वी होण्यासाठी आणि महिलांना पर्यटन व्यवसायासाठी पुरेसा वित्तपुरवठ्याची हमी मिळावी याकरिता सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका व इतर वित्तीय संस्थांच्या सहकार्याने योजना राबविण्यात येत आहे.

रोजगाराच्या संधींचा विस्तार करण्याचा प्रयत्न

नागपूर विभागातील सर्व पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि या क्षेत्रात येण्याची इच्छा असलेल्या महिला उद्योजकांसाठी ही योजना अतिशय उपयोगी आहे. धोरणांतर्गत राज्यातील महिला पर्यटकांना सुरक्षित वातावरणात बहाल करण्यासोबतच पर्यटन क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रस्तावित धोरणात नमूद आहे.

त्यामुळे राज्यभरातील महिला उद्योजिकांना यासाठी पुढाकार घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरून पर्यटन क्षेत्रात भविष्यात महिला उद्योजिका अग्रेसर असतील असे पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवई यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nana Patekar : स्वामिनाथन आयोग लागू करा

Pomegranate Production : डाळिंब उत्पादनामध्ये २० टक्के घट शक्य

Retreating Monsoon : परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

Crop Damage : स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत ४ लाख ५४ हजारांवर पूर्वसूचना

SCROLL FOR NEXT