Mazi Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Mazi Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’साठी शून्य ठेव बँक खाते उघडणार

PDCC Bank : ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी पुणे जिल्हा बँकेमध्ये महिलांना शून्य ठेव रक्कम बँक खाते सुरू करता येईल,’’ अशी घोषणा इंदापूरचे आमदार व पुणे जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रेय भरणे यांनी केली.

Team Agrowon

Pune News : ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी पुणे जिल्हा बँकेमध्ये महिलांना शून्य ठेव रक्कम बँक खाते सुरू करता येईल,’’ अशी घोषणा इंदापूरचे आमदार व पुणे जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रेय भरणे यांनी केली.

येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ व प्रशिक्षण कार्यक्रमाचे शनिवारी (ता. ६) आयोजन करण्यात आले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी जमसिंग गिरसे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी सचिन खुडे, मुख्याधिकारी रमेश ढगे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ, संदीप काळे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकाळ, अतुल झगडे आदी उपस्थित होते.

भरणे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना अंगणवाडी सेविकांनी प्रामुख्याने मुख्य भूमिका बजावली पाहिजे. अंगणवाडी सेविकेला गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाची सर्व माहिती असते. योजनेच्या नियम अटीमध्ये जे पात्र असतील, अशा महिलांचे अर्ज भरावेत. ज्या महिलांना योजनेसाठी बँक खाते सुरू करायचे आहे, त्यांच्यासाठी जिल्हा बँकेत शून्य ठेव रक्कम खाते सुरू करता येईल.

तालुक्यातील एकूण महिलांपैकी सुमारे एक लाख महिला या योजनेस पात्र होतील. अर्ज दाखल करून घेण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांनी एकत्र येत कोणत्याही महिलेला अडचण येणार नाही, असे काम करावे.’’

‘अंगणवाडी सेविकेला एक अर्जासाठी ५० रुपये’

‘‘अंगणवाडी सेविकेसह अंगणवाडी मदतनीसानांही नियमानुसार एक अर्ज दाखल करण्यासाठी ५० रुपये शुल्क मिळणार आहे. एका दिवसाला जवळपास ५० महिलांचे अर्ज दाखल होऊ शकतात. अधिकारी व अंगणवाडी सेविकांनी प्रयत्न केल्यास जिल्ह्यामध्ये इंदापूरचा प्रथम क्रमांक येईल, यासाठी प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन भरणे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT