Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'त काळाबाजार आढळल्यास थेट कारवाई, पालकमंत्री मुश्रीफांचे पोलिसांना आदेश

Maharashtra Scheme : महाराष्ट्र राज्यात यंदाच्या वर्षाचा अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर करण्यात आली.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaagrowon
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana Maharashtra : महाराष्ट्र राज्यात यंदाच्या वर्षाचा अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर करण्यात आली. या योजनेची अंमलबजावणी करताना अनेक ठिकाणी काळाबाजार होत असल्याचे दिसून येत आहे. योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरून घेणे, आदी प्रक्रियेत पैशांची मागणी होत आहे. यावर अनेक ठिकाणी कारवाई होत आहे. ही योजना प्रभावी राबवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

महिलांची अडवणूक, दिरंगाई करून पैसे घेतल्याचे आढळल्यास दोषींवर पोलिस कारवाई करावी. दलालांचा सुळसुळाट होऊ देऊ नका, असे निर्देश आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा राज्यात अग्रेसर राहिल यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात योजनेच्या आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, महिला व बालविकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, ‘योजनेसाठी नावनोंदणी, अर्जासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविली आहे. १९ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील जास्तीतजास्त महिलांची नोंदणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. नोंदणीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरून घेणे, छाननी करणे व ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देऊन गावनिहाय शिबिरांचे आयोजन करा, असे निर्देश दिले.

Ladki Bahin Yojana
Soybean Crop Kolhapur : अस्मानी अन् सुलतानीच्या भीतीनं शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे फिरवली पाठ!

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘या योजनेसाठी अडचण आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी अथवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.’ कार्तिकेयन यांनी या योजनेअंतर्गत आतापर्यंत झालेल्या नोंदणीत जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याची माहिती दिली.

महिलांना जुलै, ऑगस्टचा लाभ मिळणार

३१ ऑगस्टपर्यंत नोंद झालेल्या सर्व लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा लाभ देण्यात येणार आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com