Tractor  Agrowon
ॲग्रो विशेष

Tractor Kharedi : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केवळ रुपया भरून ट्रॅक्टर

द्राक्ष, डाळिंब, आणि ऊस शेतीमध्ये या ट्रॅक्टर्सना मोठी मागणी आहे.

Team Agrowon

Sangli News : येथील बजाज ॲग्रो ॲटो सेल्स मध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी गुढीपाडवाच्या मुहुर्तावर विशेष सवलत योजना सुरु केली आहे. केवळ ‘एक रुपया भरा’ आणि ट्रॅक्टर (Tractor) घेवून जा अशा स्वरुपाची ही योजना आहे.

शेतीचा सातबारा उतारा आणि आधार कार्ड ही कागदपत्रे जमा करुन फायनान्स मंजुरीनंतर केवळ एक रुपया भरुन या सवलचीचा लाभ घेता येईल, अशी माहिती बजाज ॲग्रो ॲटो सेल्सचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज यांनी दिली.

या योजनेविषयी अधिक माहिती देताना शेखर बजाज म्हणाले, व्हीएसटी मित्सुबिशी या कंपनीचे आम्ही सांगली जिल्ह्याचे अधिकृत डिलर आहोत. व्हीएसटी मित्सुबिशी शक्ती ट्रॅक्टरच्या १८, २२, २४, २७, २८, ३०, ४५ अश्वशक्ती क्षमतेच्या या सर्व मॉडेल्सवर ही आकर्षक योजना दिली आहे.

शेतकऱ्यांना सातबारा आणि आधारकार्ड देवून या योजनेत सहभाग होता येईल. २४ आणि २८ अश्वशक्तीचे मॉडेल्स वगळता इतर सर्व ट्रॅक्टर मॉडेल्ससाठी शासकीय नियमाप्रमाणे अनुदानही उपलब्ध आहे.

सध्या द्राक्ष उत्पादक शेतकरी कमी दरामुळे अडचणीत आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम नाही. यनमार थ्री सिलेंडर युक्त जॅपनीज तंत्रज्ञानाने संशोधित डीआय इंजिन असलेली सर्व ट्रॅक्टर मॉडेल्स ही अत्याधुनिक स्वरुपाची आहेत.

द्राक्ष, डाळिंब, आणि ऊस शेतीमध्ये या ट्रॅक्टर्सना मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांना पेरणी, लागवड, मशागत आणि फवारणी यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारांकरिता या ट्रॅक्टरचा मोठा फायदा होत आहे.

दरम्यान, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्व नवीन ट्रॅक्‍टरच्या मॉडेल्ससह शोरुम सज्ज आहे. सांगलीसह पलूस, जत, इस्लामपूर, शिराळा, विटा, कवठेमहांकाळ व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील कंपनीच्या शोरुमध्ये ही योजना लागू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

Pune Dams: धरण साखळीतील साठा ९६.८२ टक्क्यांवर

Marathi Literary Conference: दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन तंजावरला होणार

Agriculture PG Admission: केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी आजपासून पुण्यात सुरू

Maharashtra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT