Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : मुंबईकडे निघालेला ट्रॅक्टर, बैलगाडी मोर्चा पोलिसांनी रोखला

Tractor Rally : अनगर येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय सर्वांच्याच गैरसोयीचे आहे. या कार्यालयाला नरखेड, पेनूर, शेटफळ व अनगर या मंडलांतील ४३ गावे जोडली आहेत, हे कार्यालय रद्द व्हावे, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मोहोळ बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे.

Team Agrowon

Solapur News : अनगर (ता. मोहोळ) येथील नियोजित अप्पर तहसील कार्यालय रद्द करावे, या मागणीसाठी मोहोळ ते मुंबई येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानावर मोहोळ बचाव समितीकडून मंगळवारी (ता.३) नेण्यात येणारा ट्रॅक्टर, रिक्षा, बैलगाड्या आणि इतर वाहनांचा मोर्चा पोलिसांनी रोखला.

अनगर येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय सर्वांच्याच गैरसोयीचे आहे. या कार्यालयाला नरखेड, पेनूर, शेटफळ व अनगर या मंडलांतील ४३ गावे जोडली आहेत, हे कार्यालय रद्द व्हावे, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मोहोळ बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीने यापूर्वी धरणे आंदोलन केले आहे.

तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पुन्हा चौघा तरुणांनी सात दिवस आमरण उपोषण केले होते. त्यानंतर आज हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला, पण पोलिसांनी तो मोहोळलाच रोखला. या निर्णयावर बचाव समितीचे सदस्य आक्रमक झाले, त्यांनी महामार्गावरच ठिय्या मांडला.

या वेळी बारसकर म्हणाले, की अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा त्रास हा पुढील सात पिढ्यांना होणार आहे. आदेश रद्द होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. ज्या अधिकाऱ्याने हा चुकीचा अहवाल दिला आहे, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे.

या वेळी उमेश पाटील म्हणाले चुकीच्या पद्धतीने अनगरकरांनी अपर तहसील कार्यालय मंजूर करून घेतले आहे, मी नेत्यापेक्षा जनतेबरोबर आहे, या वेळी ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, संजय क्षीरसागर, सीमाताई पाटील, महेश देशमुख, विक्रम देशमुख, सुशील क्षीरसागर, किशोर पवार, मंगेश पांढरे, सत्यवान देशमुख, विनोद कांबळे, दिलीप गायकवाड, संगीता पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रशासनाचे पुन्हा आश्‍वासन

या मोर्चासाठी जवळपास २७ ट्रॅक्टर, ३० बैलगाडी, ५० रिक्षा असा वाहनांचा ताफा सकाळी मुंबईकडे रवाना होणार होता. पण त्या आधीच पोलिसांनी तो रोखला. या कृतीबद्दल आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार महसूल सुधाकर धाईंजे आणि पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना निवेदन देण्यात आले. त्यावर त्यांनी पुन्हा एकदा बैठकीचे आश्‍वासन दिले आणि हा मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

Agriculture Irrigation Scheme: शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

Post-Harvest Packaging : किरकोळ ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहोचविण्यासाठी पॅकेजिंग

Orchard Farming : नवीन फळझाडांची रोपे, कलमांची निवड

Herbal Processing Business : कोकणात सुगंधी, वनौषधींपासून तेल, पावडर निर्मिती

SCROLL FOR NEXT