Farmers Protest : 'त्या' ७५० शेतकऱ्यांना शहीद दर्जा अन् कुटुंबातील सदस्याला देणार नोकरी ; काँग्रेसची मोठी घोषणा

kangana Ranaut Statement : भाजप खासदार अभिनेत्री कंगणा राणावत हिने दिल्ली येथील शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरातून एकच टीकेची झोड उठली आहे.
Farmers Protest
Farmers ProtestAgrowon
Published on
Updated on

Pune News : भाजप खासदार अभिनेत्री कंगणा राणावत हिने दिल्ली येथील शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरातून एकच टीकेची झोड उठली आहे. देशभरातील शेतकरी नेत्यांसह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंगणाच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे. यानंतर काँग्रेसने मोठी घोषणा केली असून दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या ७५० शेतकऱ्यांना शहीदांचा दर्जा आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.

काय आहे काँग्रेसची घोषणा?

काँग्रेस खासदार रणदीप सुरेजावाला यांनी कंगणाच्या वक्तव्यावर जहरी टीका केली आहे. याबाबत त्यांनी 'एक्स' प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत कंगणावर निशाणा साधला आहे. सुरजेवाला यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की ''शेतकऱ्यांना बलात्कारी आणि हत्यारे म्हणणाऱ्या भाजपने कान उघडून ऐकावे. काँग्रेसचे सरकार आल्यावर शेतकरी आंदोलनात ज्या ७५० शेतकऱ्यांना जीव गमावावे लागले त्यांना शहीद दर्जा दिला जाईल आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीही दिली जाईल'' अशा आशयाची पोस्ट करत सुरजेवाला यांनी भाजपला सुनावले आहे.

Farmers Protest
Kangana Ranaut On Farmers Protest : आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला, बलात्कार झालेत, शेतकरी आंदोलनावरून खासदार कंगनाचे वादग्रस्त विधान

कंगणाचे वादग्रस्त विधान

दिल्ली येथे तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणासह उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन केले होते. या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर बोलताना कंगणाने म्हटले की, सध्याचे सरकार नसते तर, शेतकरी आंदोलनावेळी पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली असती. तसेच आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार आणि मोठा हिंसाचार झाल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

Farmers Protest
Farmer Protest : शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे 'चलो दिल्ली' आंदोलन सुरूच

भाजपने हात झटकले

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदार कंगणा राणावत हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे.

कंगणाच्या या वक्तव्यानंतर भाजपने अधिकृत पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने या प्रकरणी दोन लांब हात राहत कंगणाचे वक्तव्य वैयक्तिक असून पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हणत हात झटकले आहेत.

शेतकऱ्यांना म्हणाली होती दहशतवादी

दरम्यान, यापूर्वीही पहिल्या शेतकरी आंदोलनावेळीही कंगणाने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी तीने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधले होते. कायमच वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणाऱ्या कंगणावर तेव्हाही टीकेची झोड उठवली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com