Earthquake Agrowon
ॲग्रो विशेष

Earthquake in Delhi-NCR : दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे तीव्र धक्के

Delhi NCR Earthquake : सोमवारी (ता. २२ रोजी) अख्खा देश राम मंदिराच्या उद्घाटनामुळे उत्साहात होता. देशभर दिवाळी साजरी केली जात असतानाच दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे जोरदार धक्के बसले. हे धक्के दिल्ली-एनसीआरपासून चीनमध्येही जाणवले.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : सोमवारी (ता. २२ रोजी) अख्खा देश रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिर झाल्याने जल्लोष साजरा करत होता. दिल्ली-एनसीआरसह देशभरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम केले जात होते. यादरम्यान रात्री साडेअकराच्या सुमारास दिल्ली-एनसीआरला जोरदार भूकंपाचे धक्कांनी हादरवले. हा भूकंप ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. ज्याचे हादरे दिल्ली-एनसीआरशिवाय नोएडा, गाझियाबाद, हरियाणा, राजस्थान, पाकिस्तान, नेपाळ आणि चीनपर्यंत जाणवले.

भूकंपाचा केंद्रबिंदू

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीपासून १४०० किलोमीटर दूर चीनमध्ये होता. चीनच्या दक्षिणेकडील प्रांत शिनजियांगमध्ये जमिनीपासून ८० किलोमीटर खोल ७.२ रिश्टर स्केलची तीव्रता नोंदवली गेली. तर याचे धक्के दिल्ली-एनसीआरमध्ये रात्री ११.३९ वाजता बसले.

लोक भीतीने घराबाहेर

दिल्लीसह एनसीआरच्या अनेक भागात सोमवारी रात्री या भूकंपाचे धक्के बसले. यामुळे झोपलेले लोक रस्त्यावर आले. त्यांच्यात भूकंपानंतर भीतीचं वातावरण तयार झालं होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या म्हणण्यानुसार, याच्या आधी रविवारी (२१ रोजी) येथे भूकंपाचे हादरे बसले होते. रविवारी पहाटे ३.३९ वाजता येथे ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता

भूकंपाने कधी होऊ शकतो विध्वंस?

भूकंपशास्त्रज्ञांच्या मते, ५ रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपामुळे किरकोळ नुकसान होते. पण जर ही तीव्रता ५ रिश्टर स्केलच्या बाहेर असेल तर नुकसान होऊ शकते. भूकंपाची तीव्रता ६ पेक्षा जास्त असल्यास जीवित व वित्तहानी होऊ शकते. ७ पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.

दिल्लीत वारंवार भूकंप होण्याचे कारण?

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या म्हणण्यानुसार, हिंदुकुश पर्वताच्या प्लेट्स आणि युरेशियन प्लेट्स एकमेकांवर आदळत असतात. यामुळे हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, बिहार, गुजरात या भूकंपाच्या झोन ४ मध्ये येणाऱ्या शहरांमध्ये भूकंप होतात. सोमवारी रात्री दिल्ली-एनसीआरला झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू हा चीनच्या दक्षिणेकडील प्रांत शिनजियांगमध्ये होता. ज्याचा दिल्लीला सध्या कोणताही मोठा धोका नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT