Hatnur Dam : ‘हतनूर’वरील भूकंप मापक यंत्रणा बंद; शासनाचे दुर्लक्ष

भूकंप मोजणी यंत्राचा विषय समोर आला असता तापी पूर्णा नदीवर हतनूर गावी १९८२ मध्ये ४१ दरवाजे असलेल्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे.
Earthquake Measuring Device
Earthquake Measuring DeviceAgrowon
Published on
Updated on

वरणगाव, जि.जळगाव : चार दिवसांपूर्वी भुसावळ शहर व लगत तालुक्यात भूकंपाचे (Earthquake) हादरे जाणवले. मात्र, हतनूर (ता.भुसावळ) येथील तापी नदीवरील (Tapi River) हतनूर धरण (Hatnur Dam) परिसरात भूकंपाच्या तीव्रतेची नोंद घेणारी यंत्रणा बंद आहे.

पर्यायी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने धरणाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. परिणामी नवीन यंत्रणेची मागणी होत आहे.

भुसावळ तालुक्यात सर्वत्र कमी जास्त भूकंपाचे कंपन जाणवल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.

त्यानंतर भूकंप मोजणी यंत्राचा विषय समोर आला असता तापी पूर्णा नदीवर हतनूर गावी १९८२ मध्ये ४१ दरवाजे असलेल्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे.

धरणाची उंची २५.५ मीटर म्हणजे ८४ फूट तर लांबी २५८० मीटर म्हणजेच ८४६० फूट एवढि आहे.

धरणात पाणी साठविण्याची क्षमता १३.८ टीएमसीमध्ये १३८०० दशलक्ष घनफूट इतकी आहे. पाणलोट क्षेत्रातील तज्ज्ञाच्या मार्गदर्शनुसार धरणे किंवा पाणी रोखून ठेवण्यासारख्या ठिकाणी पाण्याचा अतिरिक्त दाब असतो त्या अनुषंगाने परिसरात किंवा धरण ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता असते.

मात्र जिल्ह्यात धरण निर्मितीनंतर भूकंपासारख्या घटना घडल्या नाही. मात्र यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नाशिक मेरी येथे खूप दिवसांपासून पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे.

Earthquake Measuring Device
बिहारमध्ये राजकीय भूकंप: जेडीयूची एनडीएमधून एक्झिट

यंत्रणेकरिता बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीचे सुद्धा पडझड होऊन नुकसान झाले आहे. या ठिकाणी देखभालीसाठी साधा कर्मचारी देखील नाही. मात्र भविष्यात अशी अप्रिय घटना घडू नये, घडल्यास भूकंपांची तीव्रता मोजण्यासाठी आधुनिक यंत्रणेची मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com