PM Kisan  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : पी.एम. किसान सन्मान निधी लाभासाठी पातळीवर विशेष मोहीम

Agriculture Scheme : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान सन्मान निधी) अंतर्गत लाभासाठी अनिवार्य बाबींची पूर्तता करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ५ जून ते १५ जून २०२४ या कालावधीत या गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Parbhani News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान सन्मान निधी) अंतर्गत लाभासाठी अनिवार्य बाबींची पूर्तता करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ५ जून ते १५ जून २०२४ या कालावधीत या गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व ई केवायसी करण्यासाठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (सीएससी), तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत आजवर लाभार्थींच्या खात्यावर १६ हप्ते जमा करण्यात आले असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार १७ वा हप्ता आहे.

शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी. एम. किसान सन्मान निधी) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यांत प्रतिवर्षी ६ हजार रुपये लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई केवायसी केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील ९० लाख २० हजार लाभार्थ्यांनी केली आहे. त्यानुसार भूमी अभिलेख नोंदीनुसार (आरओआर नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी या बाबींची पूर्तता करून घ्यावी.

यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या (लॅण्ड सीडिंग) लाभार्थींनी संबंधित तलाठी, तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे ई केवायसी व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत कार्यपूर्तता करावी.

पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा १७ व्या हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. या योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा १७ वा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वत: करून घ्यावे, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT