PM Kisan Sanman Nidhi : परभणी जिल्ह्यात ८०० कोटींवर अनुदान वाटप

PM Scheme : परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (पी.एम.किसान) अंतर्गंत १ ते १५ हप्त्यांचा मिळून एकूण ४ लाख २ हजार ६६१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
PM Kisan Sanman Nidhi
PM Kisan Sanman NidhiAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (पी.एम.किसान) अंतर्गंत १ ते १५ हप्त्यांचा मिळून एकूण ४ लाख २ हजार ६६१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. एकूण ८०० कोटी ४५ लाख रुपये एवढी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (पी.एम.किसान) अंतर्गंत पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर दर चार महिन्यांनी २ हजार रुपये असे मिळून वर्षभरात एकूण ६ हजार रुपये एवढे अनुदान जमा केले जाते. या अंतर्गंत अपात्र असलेल्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थींच्या यादीतून वगळण्यात आली आहेत.

PM Kisan Sanman Nidhi
PM Sanman Nidhi : सोलापुरातील २५ हजार शेतकरी ‘पीएम सन्मान’ निधीपासून वंचित

अनेक अपात्र शेतकऱ्यांकडून अनुदानाची रक्कम परत घेण्यात आली. ईकेवायसी न केल्यामुळे तसेच जमीन संलग्न नसल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या योजनेअंतर्गंत अनुदान वाटपाच्या १ ते १५ हप्त्यापर्यंत जिल्ह्यातील ४ लाख २ हजार ६६१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८०० कोटी ४५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

PM Kisan Sanman Nidhi
POCRA Subsidy : ‘पोकरा’च्या पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यात २३० कोटींचे अनुदान

या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे जिल्ह्यातील ३ लाख १८ हजार ३१९ शेतकरी लाभार्थी असून ६३ कोटी ६६ लाख रुपये अनुदानाची रक्कम आहे. त्यानंतर तिसरा हप्ता वगळता इतर हप्त्यापासून लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली आहे. १५ वा हप्त्याचे ८१ हजार ६८९ शेतकरी लाभार्थी असून अनुदानाची रक्कम १६ कोटी ३३ लाख रुपये आहे.

पीएम किसान सन्मान निधी वाटप स्थिती (रक्कम कोटीत)

हप्ता क्रमांक लाभार्थी शेतकरी रक्कम

१ ३८१३१९ ६३.६६

२ ३०९६१७ ६२.९२

३ ३१४६३९ ६२.९२

४ ३०९५९२ ६२.९१

५ ३०६४२२ ६१.२८

६ ३०१०४८ ६०.२०

७ २९६१९० ५९.२३

८ २९०८२७ ५६.६७

९ २८३३८४ ५६.६७

१० २७६१०८ ५५.२२

११ २६३०५१ ५२.६१

१२ २४९३६० ४९.८७

१३ २२२२३५ ४४.४४

१४ १८०१८० ३६.०३

१५ ८१६८९ १६.३३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com