Monsoon Update Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update : पावसाच्या आगमनाचे संकेत

Rain : समुद्रातील पाण्याचा रंग बदलू लागला, लाटांचा वेग वाढू लागल्याने मॉन्सूनचे आगमन काही दिवसांतच होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Team Agrowon

Alibaug Rain News : समुद्रातील पाण्याचा रंग बदलू लागला, लाटांचा वेग वाढू लागल्याने मॉन्सूनचे आगमन काही दिवसांतच होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्‍यामुळे मासेमारी नौका किनाऱ्यावर विसावू लागल्‍या आहेत. पावसाचे आगमन होताच खोल समुद्रातील मासेमारीचा हंगाम संपणार आहे. त्‍यामुळे मच्छीमारांना आवराआवर सुरू केली आहे.

पावसाच्या आगमनाची चाहूल सर्वांत आधी मच्छीमारांना लागते, त्‍यामुळे नौका बंदरातून बाहेर काढण्यात आल्‍या असून, सुरक्षितस्‍थळी नांगरून, शाकारून ठेवण्यात येत आहेत.

दोन महिने मासेमारी बंद राहणार असल्याने नौकांवरील खलाशी, कामगार सुटीवर जाण्याची तयारीत आहेत. यंदा तापमानाचा पारा वाढला असला, तरी पाऊस लवकर सुरू होईल, असा अंदाज मच्छीमारांकडून वर्तविण्यात येत आहे.

पावसाच्या सुरुवातीचा कालावधी मत्स्यजीवांच्या प्रजननासाठी योग्य असतो. या दरम्यान मासेमारी केल्यास मत्स्यजीवांची संख्या घटत असल्‍याने दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्याच्या किनारपट्टीवर सक्तीची मासेमारी बंदी लागू करण्यात येते. यासंदर्भातील सूचना मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमार संस्थांना दिल्या आहेत.

बंदीची सक्तीने अंमलबजावणी

बंदीचे उल्लंघन करणाऱ्या मच्छीमारांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईचे संकेत मत्स्य व्यवसाय विभागाने दिले आहेत. या कालावधीत १२ सागरी मैलापर्यंत यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना कोणत्याही योजनांचा लाभ राज्य सरकारकडून नाकारण्यात आला आहे.

यामुळे रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी बंदीचा सक्तीने पालन करण्याचे ठरविले आहे. पावसाळ्यात होणारी मासेमारी बंदी ही फक्त यांत्रिकी मासेमारी करण्याऱ्या नौकांना लागू आहे. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू राहणार नाही.

वाऱ्याचा वेग कमी आहे, त्यामुळे भूभागावर राहणाऱ्या लोकांना पावसाच्या हालचाली दिसत नाहीत; परंतु खोल समुद्रात उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे. समुद्र खवळू लागला आहे. समुद्राच्या पाण्याचा रंग आणि लाटांचा वेग वाढत असल्याने अनेक मच्छीमारांनी आधीच बंदर गाठण्यास सुरुवात केली आहे.
श्रीरंग नाखवा, मच्छीमार, अलिबाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT