Water Bunds Agrowon
ॲग्रो विशेष

Water Bunds : नाल्यांवर साकारणार सिमेंट बंधाऱ्यांची मालिका

Water Management : शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी हे बंधारे नांदी ठरणार असल्याने बागायतीला चालना मिळून शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा उद्देश यातून नक्कीच सफल होऊ शकेल.

Team Agrowon

Buldana News : तालुक्यातील वेगवेगळ्या नदी व नाल्यांवर द्वारयुक्त सिमेंट कॉक्रिंट बंधाऱ्याची निर्मिती होणार असून यामुळे पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी हे बंधारे नांदी ठरणार असल्याने बागायतीला चालना मिळून शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा उद्देश यातून नक्कीच सफल होऊ शकेल. शासनाच्या जलसंधारण विभाग व इतर यंत्रणातून तालुक्यात ४४ कामांना मंजुरी मिळाली आहे.

नांदुरा हा अवर्षणप्रवण तालुका आहे. सिंचनाच्या सोयी कमी असल्याने कोरडवाहू शेती क्षेत्र अधिक आहे. पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांची मदार अवलंबून आहे. या तालुक्यात पूर्णा नदीवर सर्वात मोठा सिंचन प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून साकारत आहे. पूर्ण क्षमतेने या प्रकल्पात नेमके कधी पाणी साठविले जाईल हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

दुसरीकडे कंडारी व लोणवाडी लघू सिंचन प्रकल्प तालुक्यात असताना पाणीटंचाई भागविण्यापुरतेच हे प्रकल्प शिल्लक राहलेले आहेत. ज्ञानगंगा, विश्वगंगा, केदार, कमळजा व काही स्थानिक नाल्यावर आतापर्यंत नव्या व जुन्या मिळून झालेल्या एकूण ३२ कोल्हापुरी व इतर छोट्या-मोठ्या बंधाऱ्यातून शेतकऱ्यांच्या सिंचनाला जोड मिळत गेली.

आज रोजी त्यातीलही काही बंधारे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत ओस पडले आहेत. सिंचन सुविधेसाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज ओळखून शासनाकडून ४४ द्वारयुक्त सिमेंट बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. यातील काही बंधाऱ्याच्या कामांना या भागाचे आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते भूमिपूजन करीत सुरुवात झाली आहे.

...तर सिंचनाला मिळणार बळकटी

शासनाने नदी-नाल्यांवर द्वारयुक्त सिमेंट बंधारा घेत सिंचनाच्या खऱ्या उद्देश साधला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण वेगाने होणार असले तरी पाणी झिरपण्याच्या प्रक्रियेला गती येण्यासाठी होत असलेल्या प्रत्येक बंधाऱ्यात ठरावीक अंतरावर रिचार्ज शॉप्ट घेत जमिनीच्या पातळीतील पाणीसाठा वाढण्यास मोठा आधार होणार आहे.

या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाचा अनुशेष आहे. तो काही अंशी कमी करण्यासाठी विविध योजनातून नदी व नाल्यांवर बंधारे घेत तालुक्याच्या भूजल पातळीत वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात तालुक्यात यातून पाणीपातळी निश्चित वाढेल.
- रामकृष्ण पाटील, जलतज्ज्ञ, नांदुरा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT