Water Bunds : पारनेरला बंधाऱ्यांसाठी तेरा कोटी रुपयांचा निधी

Maharashtra Water Conservation Corporation : कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्यासाठी पारनेर-नगर मतदार संघातील ११ गावांसाठी १२ कोटी ९२ लाख १६ हजार ४६८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Water Bund
Water BundAgrowon

Nagar News : कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्यासाठी पारनेर-नगर मतदार संघातील ११ गावांसाठी १२ कोटी ९२ लाख १६ हजार ४६८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अकरा गावांतील शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याची आमदार नीलेश लंके यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सु. पा. कुशिरे यांनी ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या नगर जिल्ह्यातील पारनेर व नगर तालुक्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या ११ योजनांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

Water Bund
Water Bunds : इंदापुरातील बंधाऱ्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकाप्रमाणे या योजनांची एकूण साठवण क्षमता ७३७.७३ स.घ.मी असून नियोजित सिंचन क्षमता २५४ हेक्टर इतकी आहे. या बाबत नीलेश लंके म्हणाले, विविध विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्याबरोबरच सिंचनाकडेही आपले लक्ष असून सिंचन क्षमता वाढवून शेतकरी वर्गाला समृद्ध करण्याचा आपला प्रयत्न आहे. यापुढील काळातही सिंचन योजनांसाठी निधी खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

Water Bund
Water Bunds : श्रमदानातून गावकऱ्यांनी बांधले ३,१२० बंधारे

बंधारे होणारी गावे कंसात मंजूर निधी

वडनेर बुद्रूक बाबर मळा : १ कोटी ६२ लाख ५० हजार ५२३, रुईछत्रपती वाबळे वस्ती : १ कोटी २३ लाख ९ हजार ५६४,गटेवाडी हडकी दरा : १ कोटी ४६ लाख ८६ हजार ३८, रांधे : १ कोटी ३० लाख ८२ हजार ९६५, पिंपळगांव कौडा (ता. नगर) : स्मशानभूमीजवळ १ कोटी ६ लाख ५ हजार ९६३,

खडकी, (ता. नगर) : ९० लाख ४३ हजार ६०९, भोरवाडी (ता. नगर) : १ कोटी ११ लाख ३ हजार ९६५, कामरगांव (ता. नगर) : १ कोटी १२ लाख ६२ हजार ११२, बाबुर्डी : १ कोटी२१ लाख ७३ हजार ३३३, दैठणे गुंजाळ :; ८४ लाख ४८ हजार ४९६, पिंपळनेर वडूले वस्ती : १ं कोटी २ लाख ४९ हजार ९२७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com