Bamboo Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Farming : आजऱ्यात बांबू चळवळीला प्रतिसाद

Bamboo Plantation : आजरा तालुक्यात बांबू चळवळीचा पाया विस्तारत चालला आहे. या चळवळीला शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : आजरा तालुक्यात बांबू चळवळीचा पाया विस्तारत चालला आहे. या चळवळीला शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. येथे नुकत्याच झालेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेत बांबूमध्ये गटशेती व्हावी, अशीच अपेक्षा बांबू तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली. क्लस्टर आधारित दृष्टिकोनातून ही चळवळ पुढे जाऊ शकते याचा पुरस्कार करण्यात आला.

आजऱ्यातील बांबू उत्पादक शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेला कोकणातून राजापूर, सांगली, पुणे यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतून दोनशेहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.

या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात बांबूतज्ज्ञ अरुण वांद्रे यांनी बांबू लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करत व्यावसायिक बांबू लागवडीसाठी उपयुक्त बांबूच्या प्रजातीची ओळख करून दिली. बांबू लागवडीचे महत्त्व विशद केले.

याबरोबरच बांबूची चळवळ ही गतिमान करण्यासाठी अवलंबलेला आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा गटशेतीचा प्रयोग हाच उपयोगी ठरणार आहे. गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी बांबू लागवड व बांबू प्रक्रिया उद्योगातून यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

दुसऱ्या सत्रात बांबू तज्ज्ञ आणि उद्योजक अशपाक मकानदार यांनी बांबूपासून तयार होणाऱ्या अनेक वस्तूंबाबत माहिती दिली. बांबू लागवडीबरोबरच बांबूवर प्रक्रिया करणारे उद्योग शेतकऱ्यांनी उभे केल्यास मूल्यवर्धन होऊन अधिकचा नफा शेतकऱ्यांना होऊ शकतो, याची खात्री दिली. याला गटशेतीच पर्याय असल्याचे नमूद केले.

दृष्टिक्षेप

आजऱ्यात बांबूलागवड क्षेत्र (पारंपरिक बांबू लागवड) २ हजार हेक्टर

व्यावसायिक बांबूलागवड ७० हेक्टर

वार्षिक उलाढाल १२० कोटी रुपये

बांबूचे उत्पादन होणाऱ्या गावांची संख्या ४०

बांबू खरेदी-विक्री केंद्र, अगरबती तयार करणारे उद्योग व कुटीर उद्योग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bidri Karkhana Sugarcane Price: 'बिद्री'च्या ऊसदराची उत्सुकता संपली! यंदाही उच्चांकी दर जाहीर

Sugar Factory: साखर कारखाना वरदान ठरला; बिराजदार

Agrowon Podcast: कांदा दरात काहीसे चढउतार, सोयाबीनचे दर स्थिर, कापूस दबावातच, गवारचे दर तेजीतच तर बाजरी नरमली

Soybean Price: सोयाबीन दर दहा वर्षांपासून ‘जैसे थे’

Bacchu Kadu: शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन थांबणार नाही; सरकारने नागपुरात येऊन चर्चा करावी: बच्चू कडू

SCROLL FOR NEXT